मुख्यमंत्री KCR यांची महाराष्ट्रात साऊथ स्टाईल एन्ट्री, गाड्यांचा लांबलचक ताफा...
By श्रीनिवास भोसले | Published: February 5, 2023 05:27 PM2023-02-05T17:27:07+5:302023-02-05T17:28:02+5:30
बीएसआर पक्षाचा गुलाबी रंगाचा पक्ष ध्वज शहरात सर्वत्र झळकत आहेत.
नांदेड: भारत राष्ट्र समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची नांदेड येथून महाराष्ट्रात एन्ट्री झाली आहे. रविवारी दुपारी दोन वाजता त्यांचे नांदेड विमानतळावर आगमन झाले. त्यानंतर ते साऊथ स्टाईल आलिशान गाड्यांच्या ताफ्यात वातानुकूित बसमध्ये गुरुद्वारा येथे पोहोचले. श्री सचखंड गुरुद्वारा येथे माथा टेकून केसीआर हे सभास्थळाकडे रवाना झाले.
केसीआर यांनी तेलंगणा राष्ट्र समितीच्या माध्यमातून तेलंगणा राज्याचा केलेल्या विकास आणि तेथील योजनांची मराठी माणसाला भुरळ पडली आहे. मागील अनेक दिवसापासून बीसीआरचे नेते तळ ठोकून सभेची तयारी करत होते. सिमवर्ती भागात सर्वाधिक बैठका घेतल्याने त्या भागातील नागरिक अधिक प्रमाणात दिसत आहेत.
शहर झालं गुलाबी
बीएसआर पक्षाच्या गुलाबी रंगाच्या पक्ष ध्वज सर्वत्र झळकत आहेत. ठिकठिकाणी लावलेले होर्डीग, आकाशातील गॅस बलून आणि केसीआर ची प्रतिमा असलेले उंच कट आऊट सर्वाचे लक्ष वेधून घेत आहेत.