जालना-नांदेड बुलेट ट्रेनसाठी ‘सीएम’चे ‘पीएम’ला पत्र; मराठवाड्यासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2022 01:38 PM2022-02-18T13:38:46+5:302022-02-18T13:49:46+5:30

Jalna-Nanded bullet train: नागपूर- मुंबईप्रमाणे जालना ते नांदेड समृद्धी महामार्ग दिला, आता याच मार्गावर बुलेट ट्रेनही द्या, अशी मागणी

CM Uddhav Thakarey's letter to PM Narendra Modi for Jalna-Nanded bullet train; Ambitious project for Marathwada | जालना-नांदेड बुलेट ट्रेनसाठी ‘सीएम’चे ‘पीएम’ला पत्र; मराठवाड्यासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प

जालना-नांदेड बुलेट ट्रेनसाठी ‘सीएम’चे ‘पीएम’ला पत्र; मराठवाड्यासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प

googlenewsNext

नांदेड : नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गाला जालना-नांदेडसमृद्धी महामार्गाने (Samruddhi Mahamarg) कनेक्ट करण्यात आले आहे. त्याचे भू-संपादन वेगवान पद्धतीने सुरू आहे. आता याच मार्गावर नागपूर- मुंबई बुलेट ट्रेनचा प्रयत्न हाेताे आहे. ताेच पॅटर्न बुलेट ट्रेनसाठी जालना- नांदेड मार्गावरही (Jalana-Nanded bullet train) वापरावा, अशी मागणी आहे. या अनुषंगाने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र माेदी यांना नुकतेच रीतसर पत्र लिहिले आहे.

राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशाेक चव्हाण यांनी ‘लाेकमत’ला याबाबत माहिती दिली. चव्हाण म्हणाले, नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गामुळे विकासाचे अनेक दरवाजे उघडणार आहेत. त्याच धर्तीवर आता मराठवाड्याच्या विकासासाठी जालना- नांदेड ही समृद्धी महामार्गाची कनेक्टिव्हिटी खेचून आणली आहे. त्यासाठी भू-संपादन सुरू आहे. नागपूर- मुंबई या समृद्धी महामार्गावर बुलेट ट्रेन चालविण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. त्याचा डीपीआरही लवकरच तयार केला जाणार आहे. या पॅटर्नकडे आपण राज्य शासनाचे लक्ष वेधून मराठवाड्यावरच अन्याय का, असा मुद्दा उपस्थित केला. 

नागपूर- मुंबईप्रमाणे जालना ते नांदेड समृद्धी महामार्ग दिला, आता याच मार्गावर बुलेट ट्रेनही द्या, अशी मागणी आपण सरकारकडे केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यासाठी सकारात्मक आहेत. एवढेच नव्हे तर, त्यांनी पंतप्रधानांना यासाठी पत्रही लिहिले आहे. या समृद्धी महामार्गावर आधीच जमिनीची साेय झालेली असल्याने बुलेट ट्रेनसाठी नव्याने भू-संपादनाची गरज भासणार नाही, याकडेही लक्ष वेधले गेले. याबाबत आपण रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याशीही चर्चा केल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

भू-संपादनासाठी ७०० काेटी मिळणार
जालना- नांदेड या समृद्धी महामार्गाचे भू-संपादन वेगाने सुरू आहे. त्यासाठी यावर्षी किमान ५०० ते ७०० काेटी रुपये मिळतील, असा अंदाज अशाेक चव्हाण यांनी व्यक्त केला.समृद्धी, बुलेट व हायस्पीड रेल्वेने नांदेड-हैदराबाद, पुणे, मुंबई ही नवी व वेगवान कनेक्टिव्हिटी निर्माण हाेणार आहे.

Web Title: CM Uddhav Thakarey's letter to PM Narendra Modi for Jalna-Nanded bullet train; Ambitious project for Marathwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.