विद्यार्थ्यांची कॉलेज फी ५० टक्के माफ करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:17 AM2021-02-15T04:17:07+5:302021-02-15T04:17:07+5:30
विद्यापीठाने देखील कॉलेज शुल्कासंदर्भात कोणतीही भूमिका घेतली नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व महाविद्यालये बंद असल्यामुळे महाविद्यालयातील कोणतेही भौतिक साधनांचा उदा. ...
विद्यापीठाने देखील कॉलेज शुल्कासंदर्भात कोणतीही भूमिका घेतली नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व महाविद्यालये बंद असल्यामुळे महाविद्यालयातील कोणतेही भौतिक साधनांचा उदा. ग्रंथालय फी, व्यायामशाळा फी, युथ फेस्टिव्हल फी, इंटरनेट फी, कॉलेज मासिक फी, ट्यूशन फी अशा अनेक सुविधा या कोरोनाच्या काळात बंद होत्या. कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांचे आर्थिक उत्पन्न बंद झाले आहे. ज्या विद्यार्थ्यांचे पालक शेतकरी आहेत त्या शेतकरी पालकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. ज्या विद्यार्थ्यांचे पालक व्यवसाय करतात त्यांचा व्यवसाय कोरोनाच्या काळात बंद होता. त्यामुळे विद्यार्थी फी देण्यास असमर्थ आहेत. त्यामुळे राज्यातील सर्व विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांना विद्यार्थ्यांची ५० टक्के फी माफ करण्याचे आदेश द्यावे व ज्या विद्यार्थ्यांनी फी भरलेली आहे त्यांची फी परत करण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी निवेदनात केली आहे. याप्रसंगी संघटनेचे पदाधिकारी संदीप वडगावे पाटील, स्वप्नील देव, राम कुद्रे, अविनाश बंडे आदी उपस्थित होते.