महाविद्यालयांचे अध्यापन आजपासून सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:17 AM2021-02-15T04:17:18+5:302021-02-15T04:17:18+5:30
शासन परिपत्रकानुसार सूचनांचे काटेकोरपणे पालन करून विद्यापीठातील शैक्षणिक संकुले, उपकेंद्रे, संचलित महाविद्यालये, संलग्नित महाविद्यालये येथील अध्यापनाचे प्रत्यक्ष वर्ग ...
शासन परिपत्रकानुसार सूचनांचे काटेकोरपणे पालन करून विद्यापीठातील शैक्षणिक संकुले, उपकेंद्रे, संचलित महाविद्यालये, संलग्नित महाविद्यालये येथील अध्यापनाचे प्रत्यक्ष वर्ग १५ रोजी सुरू होतील. यानुसार मानक कार्यप्रणाली देण्यात आली आहे. वर्ग खोल्यांची क्षमता लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना एकूण विद्यार्थी संख्येच्या ५० टक्के प्रमाणात रोटेशन पद्धतीने वर्गात अध्यापनासाठी प्रवेश देण्यात यावा किंवा संबंधित वर्गाच्या प्रवेशित विद्यार्थी संख्येनुसार नियोजन करावे, वर्ग खोली क्षमतेपेक्षा कमी विद्यार्थी प्रवेशित असतील तर त्यानुसार वर्गात अध्यापनासाठी प्रवेश देण्यात यावा. ऑनलाइन व ऑफलाइन दोन्ही पद्धतीने विषयाच्या स्वरूपानुसार वर्ग घेण्यात यावेत, पदव्युत्तर वर्गाचे नियोजन विद्यार्थी संख्या लक्षात घेऊन करावे, महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर सुविधा, विषय, विद्यार्थी संख्या विचारात घेऊन निर्णय घ्यावा, महाविद्यालयांनी आपल्या आवश्यकतेनुसार वेगवेगळ्या सत्रात वर्ग घ्यावेत, वर्ग खोल्या वेळोवेळी सॅनिटाइज करण्यात याव्यात, १ मार्चपासून वसतिगृहे सुरू करण्यात यावीत, आदी सूचनांचे पालन करण्याचे आदेश विद्यापीठाने दिले आहेत.
विद्यापीठाने दिले अध्यापनासाठी पर्याय
महाविद्यालयातील अध्यापन सुरू करण्यासाठी खालीलप्रमाणे पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. मात्र, या पर्यायांची सक्ती करण्यात आली नाही. त्यामुळे महाविद्यालयांवरच निर्णय अवलंबून असेल.
विद्यापीठाने ठरवून दिलेल्या नियोजनामध्ये पहिला पर्याय- सोमवार, मंगळवार - पदवी प्रथम वर्ष, बुधवार, गुरुवार- पदवी द्वितीय वर्ष, शुक्रवार, शनिवार- पदवी तृतीय वर्ष. दुसरा पर्याय- सोमवार, शुक्रवार- पदवी प्रथम वर्ष, मंगळवार, शुक्रवार- पदवी द्वितीय वर्ष, बुधवार, शनिवार- पदवी तृतीय वर्ष. तृतीय पर्याय-सोमवार, मंगळवार, बुधवार- पदवी प्रथम वर्ष, व गुरुवार, शुक्रवार, शनिवार- पदवी द्वितीय वर्ष, पदवी तृतीय वर्ष.