पाणंद रस्त्याच्या कामाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:17 AM2021-04-06T04:17:10+5:302021-04-06T04:17:10+5:30
पुलाचे काम रखडले नायगाव - तालुक्यातील गोदमगाव ते टाकळी रस्त्याचे काम सुरू होऊन तीन वर्षे झाली. मात्र बरबडा-कृष्णूर येथील ...
पुलाचे काम रखडले
नायगाव - तालुक्यातील गोदमगाव ते टाकळी रस्त्याचे काम सुरू होऊन तीन वर्षे झाली. मात्र बरबडा-कृष्णूर येथील रस्त्यावरील पुलाच्या कामाकडे दुर्लक्ष होत आहे. गोदमगाव, अंचोली, हिप्परगा, कृष्णूर, बरबडा, वजीरगाव, टाकळी या रस्त्याच्या कामासाठी १० कोटी ४२ लाख रुपये मंजूर झाले आहेत. माजी आ. वसंत चव्हाण यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ झाला.
कारखान्यावरील मजूर बेपत्ता
लोहा - तालुक्यातील जामगा शिवणी येथील साखर कारखान्याचा मजूर गेल्या तीन ते चार दिवसापासून बेपत्ता असल्याची तक्रार लोहा पोलिसात करण्यात आली. मधुकर शंकर गच्चे असे मजुराचे नाव आहे. या संदर्भातील तक्रार शंकर गच्चे यांनी लोहा पोलिसात दिली. पोलीस निरीक्षक भागवत जायभाये यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सूर्यवंशी करीत आहेत.
ज्ञानज्याेती शाळेचे यश
किनवट - इंटरनॅशनल मॅथेमॅटिक्स ऑलंपियाड स्पर्धेत ज्ञानज्योती पोतदार शाळेच्या विद्यार्थ्यांनी यश मिळविले. यामध्ये वेदांत पुरी, समर्थ मुक्कावार, विराट भोपाळे, आरोही, आरव कुमार, शिवांश दूधेवार, विपुल कोमावार, आरुष राजकुमार, तन्वी कौठेकर, सोहम कोरडे, विहान खाडे, सांस्कृती मेश्राम, प्राची कराड, मानवी अलसटवार, विधी लाखकर, सोमेश्वर कौटक, जय नेम्मानीवार यांचा समावेश आहे. संस्थेचे अध्यक्ष डॉ. विजय कागणे, विनयकुमार माेरे, गोविंद अंकुरवार, कपिल करेवाड, शैलेंद्र गायकवाड, आनंद आनेराव, नागनाथ कातमपल्ले, प्राचार्य संदीप चाटोरीकर यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले.
कोविड लसीकरण केंद्राची पाहणी
माहूर - तालुक्यातील वाईबाजार येथील कोविड लसीकरण केंद्राला सहाय्यक जिल्हाधिकारी कीर्तीकुमार पुजार यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी तहसीलदार राकेश गीड्डे, बिडीओ युवराज मेहत्रे, वैद्यकीय अधिकारी डॉ.श्रीनिवास हुलसुरे, डॉ. स्वप्नील राठोड आदी ही होते. नंतर पुजार यांनी आष्टा व ग्रामीण रुग्णालय येथे भेट दिली.
भुसार व्यापाऱ्यांवर कारवाई
हदगाव - लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्या दहा भुसार व्यापाऱ्यांवर तामसा येथे कारवाई करण्यात आली. सकाळी ७ ते दुपारी १२ पर्यंत दुकाने उघडी ठेवण्याची वेळ असताना भुसार मार्केटमधील गोविंद लाभशेटवार, अंबेगावकर ट्रेडिंग कंपनी, आतीश काला, संकेत पाटणी, किशोर पाटणी, विशाल पाटणी, प्रदीप पाटणी, लक्ष्मी ट्रेडिंग कंपनी, निखिल काला, स्वामी समर्थ ट्रेडिंग कंपनीचे मालक यांच्याविरूद्ध कारवाई करण्यात आली.
लसीकरण करून घ्या
किनवट - किनवट तालुक्यातील जनतेने कोरोनाची लस टोचून घ्यावी असे आवाहन सहाय्यक जिल्हाधिकारी कीर्तीकुमार पुजार यांनी केले. सध्या हॉटस्पॉटमध्ये किनवट तालुका नांदेड जिल्ह्यात तिसऱ्या स्थानावर आहे. यापासून बचावासाठी गोकुंदा, मांडवी, सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र येथे लसीकरण केंद्र उघडण्यात आली. लसीविषयी कोणतेही गैरसमज न करता ती टोचून घ्यावी असे आवाहनही पुजार यांनी केले.
गंजगाव येथे लसीकरण
कुंडलवाडी - येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत माचनूर उपकेंद्रामधील गंजगाव येथे कोविड लसीकरणाला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी ५९ नागरिकांनी लस घेतली. वैद्यकीय अधिकारी डॉ. विनोद माहुरे यांच्या मार्गदर्शनाखाली या मोहिमेला सुरुवात करण्यात आली. यावेळी डॉ. पाटील, आरोग्य सेविका ए.बी. वानोळे, आरोग्य सेवक जे. के. पवळे, अंगणवाडी कार्यकर्ती आशा घाटे आदींची उपस्थिती होती.
बिबट्याचा वावर
किनवट - किनवट तालुक्यातील सिंदगी (मो.) येथे शनिवारी रात्री काही लोकांना बिबट्या आढळून आला. रात्री १०.३० वाजता शेतकरी पाण्याची मोटार चालू करून त्याची पाहणी बॅटरीच्या सहाय्याने करीत असताना बिबट्या असल्याचे त्यांना लक्षात आले. स्वतचे रक्षण करण्यासाठी शेतातील कचरा पेटवून आरडाओरड केला. त्यामुळे बिबट्या पळून गेला.