रसशाळेतील औषधींच्या दर निश्चीतीसाठी समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2018 12:31 AM2018-03-02T00:31:01+5:302018-03-02T00:31:07+5:30

येथील शासकीय आयुर्वेदीक व युनानी रसशाळेसाठी लागणाºया कच्च्या औषधी द्रव्यांची पॅकींग करण्यासाठी तसेच उत्पादीत औषधांचे दर निश्चीत करण्यासाठी शासनाने अधिष्ठातांच्या अध्यक्षतेखाली एका समितीचे गठन केले आहे. या समितीत एकूण चार सदस्य राहणार आहेत.

 Committee for determining drug rates | रसशाळेतील औषधींच्या दर निश्चीतीसाठी समिती

रसशाळेतील औषधींच्या दर निश्चीतीसाठी समिती

googlenewsNext
ठळक मुद्देशासकीय आयुर्वेदीक व युनानी रसशाळा : पॅकींग मटेरियल्सचेही दर ठरणार

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : येथील शासकीय आयुर्वेदीक व युनानी रसशाळेसाठी लागणाºया कच्च्या औषधी द्रव्यांची पॅकींग करण्यासाठी तसेच उत्पादीत औषधांचे दर निश्चीत करण्यासाठी शासनाने अधिष्ठातांच्या अध्यक्षतेखाली एका समितीचे गठन केले आहे. या समितीत एकूण चार सदस्य राहणार आहेत.
नांदेड येथील शासकीय आयुर्वेदीक व युनानी रसशाळेमार्फत शासकीय आयुर्वेदीक महाविद्यालय व रूग्णालय, जिल्हा परिषदेंतर्गत असलेले आयुर्वेदीक व युनानी रूग्णालयांना औषधींचा पुरवठा केला जातो. यासाठी आवश्यकतेनुसार कच्ची औषधी द्रव्य आणि त्यासाठी लागणाºया पॅकींग मटेरियल्सची खरेदी केली जाते. मात्र या सर्व प्रक्रियेत वेळेचा अपव्यय होत असल्याने खरेदीसाठी विलंब होत होता.
परिणामी, रसशाळेचे काम प्रभावित होत होते. ते टाळण्यासाठी आणि रसशाळेद्वारा उत्पादीत औषधांच्या किंमती निश्चीत करण्यासाठी शासनाने नवीन समिती गठीत केली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी शासकीय आयुर्वेदीक व युनानी रसशाळेचे अधिष्ठाता असतील. निवासी उपजिल्हाधिकारी आणि शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाच्या रसशास्त्र विभागाचा एक प्राध्यापक सदस्य म्हणून कार्यरत राहणार आहे. सदस्य सचिवपदी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या औषध निर्माणशास्त्र विभागाचे प्राध्यापक काम पाहणार आहेत.
या समितीमार्फत तीन लाखांपर्यंतच्या मर्यादेतील खरेदी पूर्ण केली जाणार आहे. तसेच रसशाळेसाठी लागणारा कच्चामाल खरेदी करण्यापूर्वी रसशाळेत उपलब्ध असलेल्या औषधी द्रव्यांचा साधा व आवश्यकता विचारात घेवून गरजे इतकाच कच्चामाल आणि पॅकेजींग मटेरियल्सची खरेदी करणे, पॅकेजींग मटेरियल खरेदी करण्यासाठी संबंधित पुरवठादाराकडून योग्य त्या अटी व शर्तींचे पालन होते की नाही हे पाहण्याची जवाबदारी त्यांच्यावर आहे.
या समितीकडे तीन लाखापर्यंतच्या खरेदीचे अधिकार देण्यात आले आहेत. तीन लाखांपेक्षा जास्त आणि एक कोटीपेक्षा कमी रक्कमेच्या खरेदीचे अधिकार हे जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखालील समितीला देण्यात आले आहेत.
या समितीच्या सदस्यपदी आयुष संचालनालयाचे संचालक आणि आयुर्वेद महाविद्यालयाच्या अधिष्ठातावर सदस्य सचिवपदाची जवाबदारी दिली आहे.

Web Title:  Committee for determining drug rates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.