रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी समिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:17 AM2021-04-10T04:17:39+5:302021-04-10T04:17:39+5:30
काळाबाजार करणाऱ्यांवर गुन्हे रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे औषधींचा काळाबाजार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे याबाबत समिती ...
काळाबाजार करणाऱ्यांवर गुन्हे
रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे औषधींचा काळाबाजार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे याबाबत समिती स्थापन करण्यात आली आहे. यापुढे औषधींचा काळाबाजार करणाऱ्यांच्या विराेधात तत्काळ गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. कुठे अशाप्रकारे काळाबाजार होत असल्यास नागरिकांनी समितीकडे थेट तक्रार करावी असे आवाहन जिल्हाधिकारी विपीन ईटणकर यांनी केले आहे.
घाबरु नका गरजूंना इंजेक्शन मिळेल
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे रेमडेसिवीरची मागणी वाढली आहे. गरजू रुग्णांना इंजेक्शनचा पुरवठा होत आहे. विनाकारण गरज नसताना काही खाजगी रुग्णालये रेमडेसिवीर इंजेक्शन देत आहेत. त्यामुळे मागणी वाढली आहे. विषाणूचा स्कोअर १० च्या पुढे आहे अशा रुग्णांनाच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रेमडेसिवीर इंजेक्शन द्यावे असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.