घोटाळ्यांमुळे सर्वसामान्य हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 12:22 AM2019-02-25T00:22:19+5:302019-02-25T00:24:46+5:30

गेले वर्षभर नांदेड जिल्हा विविध राज्यव्यापी घोटाळ्यांमुळे प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. सर्वसामान्यांनी मोठ्या अपेक्षेने जादा परताव्याच्या आशेने बिटकॉईन, भिशी, चिटफंडमध्ये गुंतवणूक केली होती़ परंतु, घोटाळेबाजांनी वेगवेगळ्या घोटाळ्यांत नांदेडकरांना जवळपास शंभर कोटींहून अधिकचा गंडा घातला़ या घोटाळ्यामुळे अनेकांनी आपल्या आयुष्याची जमापुंजी गमावली असून ते आता हवालदिल झाले आहेत़

Common Havoc due to scams | घोटाळ्यांमुळे सर्वसामान्य हवालदिल

घोटाळ्यांमुळे सर्वसामान्य हवालदिल

Next
ठळक मुद्देकोट्यवधींचा गंडा बीटकॉईन, चीटफंड, भिशी, नोकर भरतीमध्ये नांदेडकरांची फसवणूक

नांदेड : गेले वर्षभर नांदेड जिल्हा विविध राज्यव्यापी घोटाळ्यांमुळे प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. सर्वसामान्यांनी मोठ्या अपेक्षेने जादा परताव्याच्या आशेने बिटकॉईन, भिशी, चिटफंडमध्ये गुंतवणूक केली होती़ परंतु, घोटाळेबाजांनी वेगवेगळ्या घोटाळ्यांत नांदेडकरांना जवळपास शंभर कोटींहून अधिकचा गंडा घातला़ या घोटाळ्यामुळे अनेकांनी आपल्या आयुष्याची जमापुंजी गमावली असून ते आता हवालदिल झाले आहेत़
घोटाळ्यांची सुरुवातच राज्यभर गाजलेल्या एमपीएससी नोकर भरतीपासून झाली़ किनवट तालुक्यात या घोटाळ्यात सुरुवात झाली़ नोकर भरतीच्या परीक्षेत आपल्या जागी हुशार उमेदवाराला बसवून नोकरी मिळवून देण्याच्या आमिषाने शेकडो बेरोजगारांना गंडविण्यात आले़ अशाप्रकारे राज्यभर बोगस उमेदवार परीक्षेला बसवून वर्ग- १ ते ४ पर्यंत नोकऱ्या मिळविल्या़ या प्रकरणाचा सीबीआयकडून तपास सुरु असून आतापर्यंत ३० हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे़ त्यामध्ये पोलीस अधिकाºयांसह उच्चपदस्थांचा समावेश आहे़
कोट्यवधी रुपयांचा हा घोटाळा होता़ यामध्ये पैसे गेलेल्यांना नंतर तुरुंगाची हवा खावी लागली़ त्यानंतर पोलीस भरतीतही असाच प्रकार झाला़ पेपर तपासणीचे काम करणाºया कंपनीच्याच काही कर्मचाºयांचा यात समावेश होता़ उमेदवाराकडून पैसे घेवून त्यांची प्रश्नपत्रिका सोडविण्यात येत होत्या़ तत्कालीन पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी हा घोटाळा उघडकीस आणला होता़ यामध्येही बेरोजगार तरुणांची लाखो रुपयांची फसवणूक झाली़ राज्यभर या घोटाळ्याची व्याप्ती असून अजूनही तपास सुरुच आहे़ तर देशभर गाजलेल्या बिटकॉईनच्या घोटाळ्याची सुरुवातही अमित भारद्वाज याने नांदेडातूनच केली़
गेन बिटकॉईनने शेकडो नांदेडकरांना कोट्यवधींना गंडविणाºया अमित भारद्वाज याला पुणे पोलिसांनी पकडले होते़ त्यानंतर या प्रकरणात देशभरात जवळपास २५ हून अधिक ठिकाणी त्याच्यावर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत़ हा सर्व व्यवहार जवळपास हजारो कोटींचा असल्याचे तपासात पुढे आले आहे़ परंतु, फसवणुकीच्या रकमेची वसुली करण्यात यंत्रणेला यश आले नसल्यामुळे नांदेडमधील गुंतवणूकदार मात्र हैराण झाले आहेत़
व्हर्च्युअल करन्सी, क्रिप्टोकरन्सी म्हणजेच अदृश्य चलनाच्या मायाजालात ओढत गेट बिटकॉईनच्या माध्यमातून अमित भारद्वाज याने नांदेडकरांना गंडविले होते. नांदेडातील फसवणुकीचा हा आकड तब्बल शंभर कोटीपर्यंत गेला आहे़
यामध्ये अनेक प्रतिष्ठित मंडळींचा समावेश आहे़ अमित भारद्वाज याने ओळखीचा फायदा घेत नांदेडात अनेकांशी संपर्क साधून त्यांच्याकडील बिटकॉईन घेतले होते़ त्यावेळी या अदृश्य चलनाच्या बाजारात एका बिटकॉईनची किंमत ही ७३ हजार रुपये एवढी होती़ या बिटकॉईनच्या बदल्यात अमित भारद्वाज याने १८ महिन्यांत ८० टक्के परतावा देण्याचे आश्वासन दिले होते़ सुरुवातीला काही जणांना ही रक्कमही देण्यात आली़
त्यानंतर मात्र भारद्वाज याने गुंतवणूकदारांना बिटकॉईन देण्यास नकार दिला़ त्या बदल्यात त्याने स्वत: तयार केलेले एम कॅप हे चलन गुंतवणूकदारांच्या माथी मारले़ त्यावेळी एम कॅपची बाजारात किंमत केवळ १४ हजार रुपये होती़ परंतु हे एम कॅप जर खरेदीदाराने भारद्वाजला विक्री केल्यास तो त्याची किंमत अर्ध्याहून कमी देत होता़ अशाप्रकारे भारद्वाज बिटक्वॉईन ग्रोथ फ्रंट या कंपनीच्या माध्यमातून बिटकॉईन आणि एम कॅप या दोन्ही आभासी चलनाद्वारे गुंतवणूकदारांना गंडविले़ अशाप्रकारे नांदेडकरांना घोटाळ्यात गंडविण्यात आले आहे़
व्यवहार करताना खबरदारी पाळा
आजघडीला आॅनलाईन फसवणुकीचा फंडा सुरु झाला आहे़ तुमच्याकडून माहिती घेवून गुन्हेगार तुमच्या खात्यातील रक्कम पळवित आहेत़ कुणाही व्यक्तीला बँक खाते व माहिती शेअर करु नये़ स्कीममध्ये पैसे गुंतविताना खबरदारी घेणे गरजेचे आहे़ नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण होणे आवश्यक आहे, असे आवाहन पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी केले़
चिटफंडची चिटींग कोट्यवधी रुपयांची
चिटफंडमध्ये गुंतवणूक केल्यास दामदुप्पट देण्याचे आमिष दाखवित संतकृपा मार्केटमधील मुंदडा चिटफंडने गुंतवणूकदारांना गंडविले़ फसवणुकीचा हा आकडा सध्या लाखात असला तरी, लवकरच तो कोट्यवधीत जाण्याची शक्यता आहे़ ३० हप्त्यांच्या भिशीत अनेक गुंतवणूकदारांनी जवळपास २६ हप्ते पैसे भरले होते़ चिटफंड चालकाने अगोदर गुंतवणूकदारांचा विश्वास जिंकण्यासाठी त्यांना जादा रक्कम दिली़ ही कंपनी नोंदणीकृत असून एका पैशालाही धक्का लागणार नाही, असे गुंतवणूकदारांना पटवून देण्यात आले होते़ त्यामुळे शासकीय नोकरदारापासून ते व्यापाºयांसह अनेकांनी यामध्ये गुंतवणूक केली होती़ २६ हप्त्यांची ही रक्कम लाखाच्या घरात जाते़ परंतु, चिटफंड चालकाने रजिस्ट्रार कार्यालयात नोंदणी करावयाची आहे़ असे सांगून गुंतवणूकदारांकडील डायºया घेतल्या़ त्यानंतर चिटफंडच्या कार्यालयाला कुलूप लावून धूम ठोकली़ या प्रकरणात न्यायालयाच्या आदेशावरुन वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़मात्र या प्रकरणातील आरोपी अद्यापही फरारच आहेत़
अभिनंदऩ़़तुम्हाला बक्षीस लागले

  • मोबाईलवर अभिनंदन तुम्हाला कार किंवा इतर साहित्याचे बक्षीस लागले़ असा संदेश मागील काही दिवसांत फिरत होता़ या संदेशानंतर संबंधित व्यक्ती फोन करुन कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी आमच्या कंपनीच्या खात्यात ठरावीक रक्कम जमा करण्यास सांगते़ मोठ्या बक्षिसाच्या आशेने नांदेडातील अनेकांनी रक्कम भरल्यानंतर त्यांची फसवणूक झाली़
  • उपजिल्हाधिका-यांना बसला होता फटका
  • नांदेडचे उपजिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांच्या क्रेडीट कार्डच्या माध्यमातून सायबर गुन्हेगारांनी जवळपास पावणेतीन लाख रुपयांचा गंडा घातला होता़ त्यांच्या क्रेडीट कार्डच्या माध्यमातून आरोपींनी भारतीय पैशाद्वारे डॉलर खरेदी केले होते़ बँकेतून ई-मेल आल्यानंतर ही बाब उघडकीस आली़
  • त्याच दिवशी निहलानी कुटुंबाचेही ८० हजार रुपये लंपास करण्यात आले होते़ रात्री ११ वाजून ४५ मिनिटांना ४० हजार रुपये अन् १२ वाजून ५ मिनिटांनी ४० हजार असे ८० हजार रुपये त्यांच्या खात्यातून गायब झाले होते़ त्यासाठी आरोपींनी त्यांच्या एटीएमच्या माहितीचा वापर केला होता़
  • तसेच तुमच्या खात्यावर तुमच्या मित्राने हजार रुपये जमा केले़असे मॅसेज आले. मेसेजमध्ये देण्यात आलेल्या इंटरनेट लिंकवर गेल्यावर आपल्या बँक खात्याची माहिती आरोपीकडे जावून मोठी फसवणूक होण्याची शक्यता सायबर सेलने व्यक्त केली होती़ नांदेडात दिवसाकाठी अनेकांना अशाप्रकारचे किमान तीन मेसेज आले होते़

Web Title: Common Havoc due to scams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.