नांदेड जिल्ह्यात २५ मार्चपासून संपूर्ण लॉकडाऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:16 AM2021-03-22T04:16:28+5:302021-03-22T04:16:28+5:30
सर्व किराणा दुकानांचे ठोक विक्रेते १२ वाजेपर्यंत आपले दुकान सुरू ठेवू शकतील. किरकोळ विक्रेत्यांना दुपारी १२ पर्यंत दुकानातून घरपोच ...
सर्व किराणा दुकानांचे ठोक विक्रेते १२ वाजेपर्यंत आपले दुकान सुरू ठेवू शकतील. किरकोळ विक्रेत्यांना दुपारी १२ पर्यंत दुकानातून घरपोच किराणा माल पाठवता येईल. दूध विक्री आणि वितरण सकाळी १० वाजेपर्यंत घरपोच करता येईल. फळ आणि भाजीपाला विक्रेत्यांना सकाळी ७ ते १० या वेळेत फिरून विक्री करता येईल. सर्व रुग्णालये व रुग्णालयाशी निगडित सेवा नियमित सुरू राहतील. कोणतेही रुग्णालय लॉकडाऊनचे कारण सांगून रुग्णांना सेवा नाकारणार नाही. तसे झाल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल. सॉ मीलही बंद ठेवल्या जातील. केवळ स्मशानभूमीच्या बाजूच्या सॉ मील चालू राहतील. जिल्ह्यातील सर्व कर्मचाऱ्यांना कार्यालयांचे ओळखपत्र आवश्यक राहणार आहे. डी. मार्ट, सुपर मार्केटही बंद राहणार असून ऑनलाइन माध्यमातून १२ वाजेपर्यंत घरपोच साहित्य देता येईल.
या सर्व आदेशांचे पालन करण्यासाठी मनपा व पोलीस विभागाची संयुक्त पथके आणि न.प. हद्दीत न.प. व पोलीस विभागाची पथके, तर गावपातळीवर ग्रामपंचायत व पोलीस विभागाची संयुक्त पथके कार्यान्वित करण्याचे आदेशही जिल्हाधिकारी डाॅ. विपिन इटनकर यांनी दिले आहेत.