लग्नाच्या चिंतेने तरुणीने घेतला गळफास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:49 AM2020-12-04T04:49:14+5:302020-12-04T04:49:14+5:30
घरची आर्थिक परिस्थिती अगदी बेताची आहे. घरी पुजाच्या लग्नाची बोलणी सुरू झाली होती; परंतु लग्नासाठी पैसेच नसल्यामुळे सर्वजण चिंतेत ...
घरची आर्थिक परिस्थिती अगदी बेताची आहे. घरी पुजाच्या लग्नाची बोलणी सुरू झाली होती; परंतु लग्नासाठी पैसेच नसल्यामुळे सर्वजण चिंतेत होते. चिंतेने ग्रासलेल्या पुजाने १ डिसेंबर रोजी सायंकाळी घरातील पत्र्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत शकुंतला माळगे यांनी पोलिसांना माहिती दिली. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे, तर दुसऱ्या एका घटनेत नांदेड शहरात एका तरुणाने गळफास घेऊन जीवन संपविले. सोपान अशोक बट्टेवाड (१८) रा.कोल्हा, ता.मुदखेड असे मृताचे नाव आहे. छत्रपती चौकातील एका अपार्टमेंटमध्ये त्याने गळफास घेतला. ही घटना १ डिसेंबर राेजी घडली. या प्रकरणात संभाजी बट्टेवाड यांनी दिलेल्या माहितीवरून भाग्यनगर पोलिसांनी आकस्मिक मृत्युची नोंद केली आहे.