खुरगाव-नांदुसा येथे विशेष श्रामणेर प्रशिक्षण शिबिराचा समारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:31 AM2021-03-04T04:31:47+5:302021-03-04T04:31:47+5:30
कार्यक्रमाला नगरसेवक बापूराव गजभारे, जिल्हा समाज कल्याण सहायक आयुक्त तेजस माळवतकर, समाज कल्याण निरीक्षक डी. आर. दवणे, स्वारातीम ...
कार्यक्रमाला नगरसेवक बापूराव गजभारे, जिल्हा समाज कल्याण सहायक आयुक्त तेजस माळवतकर, समाज कल्याण निरीक्षक डी. आर. दवणे, स्वारातीम विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. रवी सरोदे, महावितरणचे कार्यकारी अभियंता जे. एन. चव्हाण, जिल्हा नियोजन व विकास समितीचे उपेंद्र तायडे, डॉ. एन. के. सरोदे, जिल्हा उद्योग केंद्राच्या सल्लागार प्राचार्या डॉ. संघमित्रा गायकवाड, गंगाधर ढवळे, उपप्राचार्य साहेबराव इंगोले यांची उपस्थिती होती. श्रामणेर प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून बौद्ध संस्कृती रुजविण्याला चालना मिळाली आहे. मोठ्या प्रमाणावर लोकांमध्ये जागृती निर्माण होत आहे. चोवीस तास अष्टोप्रहर चालणारे हे भारतातील एकमेव श्रामणेर प्रशिक्षण केंद्र असल्याचे यावेळी सांगण्यात आले. मंचावर भिक्खू संघाचे आगमन झाल्यानंतर तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पवंदन व दीपप्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले. धम्मसंदेश पथकाचे अंबादास कांबळे, राम कांबळे, इश्वर जोंधळे यांनी याचना केल्यानंतर भदंत पंय्याबोधी थेरो यांनी उपासकांना त्रीसरण पंचशील दिले. त्यानंतर भंते संघरत्न यांची धम्मदेसना झाली. विदिशा महिला मंडळाच्यावतीने कमलताई सरोदे, जिजाबाई झिंझाडे, पद्मिनबाई धुळे, सुजाता शिरसे, पांडुरंग वाकळे, प्रबुद्ध चित्ते यांनी भोजनदान केले. सुभाष लोकडे व भीमगीत गायन संचाच्यावतीने गीत गायन केले. आशीर्वाद गाथेनंतर सोहळ्याची सांगता झाली. प्रास्ताविक गंगाधर ढवळे यांनी, सूत्रसंचालन प्रा. रणजित गोणारकर यांनी, तर आभार शंकर नरवाडे यांनी मानले.