भ्रष्टाचार व राजकारणाचा अड्डा बनल्याने एसटी महामंडळाची ही अवस्था: राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2021 05:10 PM2021-11-11T17:10:07+5:302021-11-11T17:13:25+5:30

Raju Shetty भाजपने सरकार असतांना काय केले, असा सवाल राजू शेट्टी यांनी केला

This is the condition of ST Corporation as it has become a hotbed of corruption and politics - Raju Shetty | भ्रष्टाचार व राजकारणाचा अड्डा बनल्याने एसटी महामंडळाची ही अवस्था: राजू शेट्टी

भ्रष्टाचार व राजकारणाचा अड्डा बनल्याने एसटी महामंडळाची ही अवस्था: राजू शेट्टी

Next

- गोविंद टेकाळे
अर्धापूर ( नांदेड ) : - महाराष्ट्राची लालपरी अर्थात एसटी महामंडळ (ST Strike ) आज घडीला भ्रष्टाचार व राजकारणाचा अड्डा बनला आहे. यामुळे एसटीचे अर्थकारण बिघडून सध्याची बिकट परिस्थिती निर्माण झाल्याची टीका  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे‌ नेते व माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी पत्रकारांशी संवाद साधताना केली.

ते पुढे म्हणाले, महाराष्ट्राची लालपरी ही सर्वसामान्य माणसांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. आज घडीला ही लालपरी गचके खायला लागली आहे. यास गेल्या काही काळामध्ये राज्यात सत्तेत असलेली सरकारे जबाबदार आहेत.  मोठमोठ्या घोषणा करून सर्व बोजा महामंडळ वर टाकायचा टायर खरेदी,साहित्य खरेदीमध्ये मोठा भ्रष्टाचार करायचा महामंडळ राजकारणाचा अड्डा बनला असून याचे परिणाम आज एसटीचे अर्थ कारण बिघडून गेले आहे. एसटी जनसामान्यांनचा आधारवड आहे. त्यामुळे राजकारण बाजूला ठेवत बजेटमध्ये भरीव तरतूद करून एसटी महामंडळ वाचवावे लागेल. यासाठी एसटीचे सरकारीकरण करणे हा पर्याय आहे. यासाठी कामगारांनी सुद्धा विचार करणे गरजेचे आहे, असे शेट्टी म्हणाले. यावेळी माजी अध्यक्ष वस्त्रोद्योग महामंडळ रविकांत तुपकर,माजी प्रदेशाध्यक्ष प्रा.डॉ. प्रकाश पोपळे,स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष हनुमंत राजेगोरे,अमोल हिप्परगे सोलापूर,स्वाभिमानी शिक्षक संघटना मराठवाडा अध्यक्ष सतीश सोनटक्के,जिल्हाध्यक्ष शिक्षक संघटना शेख जावेद,जेष्ठ नेते किशनराव कदम यांच्या सह अनेकजन उपस्थितीत होते.

भाजपने सरकार असतांना काय केले,
भारतीय जनता पार्टीचे नेते एसटी कामगारांसाठी आंदोलन करत आहेत. त्यांनी त्यांचे सरकार असतांना एसटीसाठी काय केलं याचं उत्तर द्यावे लागेल. कारण जनता त्यांच्याकडे उत्तर मागत आहे. सर्वांनीच एसटीचा फक्त वापरून घेतला आहे असे ही शेट्टी म्हणाले. 

Web Title: This is the condition of ST Corporation as it has become a hotbed of corruption and politics - Raju Shetty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.