मॅट्लॅबवर सातदिवसीय कार्यशाळा संपन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:14 AM2021-07-15T04:14:28+5:302021-07-15T04:14:28+5:30
या कार्यशाळेसाठी बाराशेहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. कार्यशाळेचे उद्घाट्न स्वा. रा. ती. म. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी ...
या कार्यशाळेसाठी बाराशेहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. कार्यशाळेचे उद्घाट्न स्वा. रा. ती. म. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी केले. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष. डॉ. माधवराव पाटील किन्हाळकर, तर विज्ञान व तंत्रज्ञान अधिष्ठाता डॉ. एल. एम. वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यशाळेचे प्रमुख आयोजक प्राचार्य डॉ. पंजाब चव्हाण यांनी मनोगत केले. संयोजक डॉ. डी. डी. पवार यांनी प्रास्ताविक केले. समन्वयक विभागप्रमुख डॉ. सतीश चव्हाण यांच्या संकल्पनेतून विद्यापीठ परिसरातील सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना तज्ज्ञ मार्गदर्शकाच्या मदतीने गणित विषयाचे प्रॅक्टिकल ऑनलाईन डेमॉन्स्ट्रेशन लाभ घेता आला, तर सहसंयोजक म्हणून डॉ. अरविंद चव्हाण यांनी जबाबदारी पार पाडली. यशस्वीतेसाठी प्रशांत टाके, प्रा. डॉ. निरज पांडे, प्रा. डॉ. एस. एस. बेल्लाळे, प्रा. डॉ. व्ही. सी. बोरकर, प्रा. डॉ. वाय. एम. मुळे, प्रा. डॉ. बी. बी. पंडित, आदींचे सहकार्य लाभले. समारोप प्राचार्य डॉ. पंजाब चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली व व्यवस्थापन परिषद सदस्या डॉ. वैजयंता पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.