भाजपच्या अपप्रचाराला सडेतोड उत्तर देण्याची जबाबदारी काँग्रेस सोशल मीडियाची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:20 AM2021-02-09T04:20:28+5:302021-02-09T04:20:28+5:30
चव्हाण म्हणाले वर्तमानपत्रापेक्षाही अधिक गतीने माहिती पोहचविण्याचे साधन सोशल मीडिया आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती पोहचविताना वास्तव माहिती लोकांपर्यंत ...
चव्हाण म्हणाले वर्तमानपत्रापेक्षाही अधिक गतीने माहिती पोहचविण्याचे साधन सोशल मीडिया आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती पोहचविताना वास्तव माहिती लोकांपर्यंत पोहचवून विश्वासहर्ता निर्माण करणे गरजेचे आहे. भाजपासह विरोधकांच्या अपप्रचाराला अभ्यासपूर्ण माहितीतून सडेतोड उत्तर देणे गरजेचे आहे. यासमवेतच समाजात अनेक चांगल्या गोष्टी घडत असतात. या गोष्टीही समाजात पोहोचविल्या पाहिजेत. जनतेपर्यंत माहिती पोहचविण्यासाठी सोशल मीडियाच्या पदाधिकार्यांनी अपडेट राहणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले. यावेळी आ.अमरनाथ राजूरकर म्हणाले की, विधानसभा निहाय पदाधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली.लवकरच तालुका निहाय काँग्रेस सोशल मीडिया पदाधिकार्यांची नियुक्ती करण्यात यावी. सोशल मीडियातील पदाधिकार्यांना लोकांपर्यंत योग्य व खरी माहिती पोहचविण्यासाठी त्यांना अभ्यासपूर्ण मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. सोशल मीडियाची टीम सक्षम झाल्यास निश्चित काँग्रेस पक्षाला यातून बळ मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सावंत म्हणाले, सोशल मीडिया हे परसेप्शन बनविण्यासाठी महत्त्वाचे माध्यम आहे. सोशल मीडियावर लोकांचा विश्वास असल्याने विश्वासपूर्ण व खरी माहिती जनतेपर्यंत पोहचविणे गरजेचे आहे. काँग्रेस सोशल मीडियाचे पदाधिकारी काँग्रेसच्या विचाराने जोडल्या गेले असल्याने वैचारिक भूमिकेतून पक्षाची बाजू मांडली गेली पाहिजे. नेहरू, गांधी व काँग्रेस विचारधारेच्या पुस्तकांचे पदाधिकार्यांनी वाचन करावे, ज्यामुळे काँग्रेसची विचारधारा मांडणे सोपे होईल, असे ते म्हणाले. प्रारंभी संतोष पांडागळे यांनी प्रास्ताविक केले. तर उपस्थितांचे आभार गोविंदराव शिंदे नागेलीकर यांनी मानले.
यावेळी काँग्रेस सोशल मीडियाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अभिजीत हाळदेकर, श्रीनिवास शिंदे, कपिल लोखंडे, सलमान बबिशार, नझिया सबा, डॉ.आर्शिया कौसर, आरिफ खान, प्रसाद हरण, पिंटू आलेगावकर, राजू बारसे, गजानन कोकाटे, गुरूनाथ पालेकर, बाबासाहेब बाबर, रुपेश पाटील, परमेश्वर कट्टे, प्रमोद भुरेवार, दत्ताहरी लोहारे, सखानंद पुरी, हरजिंदरसिंघ संधू आदींची उपस्थिती होती.