देगलूरची पोटनिवडणूक काँग्रेसच लढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:28 AM2021-05-05T04:28:41+5:302021-05-05T04:28:41+5:30
देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक सोमवारी नांदेड येथे घेण्यात आली. यावेळी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत ...
देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक सोमवारी नांदेड येथे घेण्यात आली. यावेळी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. रावसाहेब अंतापूरकर हे जरी आमदार असले तरी सामान्य कार्यकर्त्याप्रमाणे लोकांमध्ये रहात असत. ते जेव्हा मला भेटत, तेव्हा केवळ मतदारसंघाच्या विकासासाठीच आग्रही असायचे. त्यांच्या निधनामुळे आपणांस विधानसभा पोटनिवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. महाविकास आघाडीमध्ये ही जागा काँग्रेस पक्षाचीच असून, केंद्रीय नेतृत्वाच्या आदेशानुसार उमेदवार निश्चित केला जाईल. उमेदवार कोणीही असो, काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आजपासूनच निवडणुकीच्या कामाला लागले पाहिजे.
बैठकीच्या प्रारंभी रावसाहेब अंतापूरकर यांच्या प्रतिमेचे पालकमंत्री चव्हाण व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. प्रास्ताविक काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेतील प्रतोद आमदार अमरनाथ राजूरकर यांनी केले. देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीतील काँग्रेस पक्षाचा उमेदवार ठरविण्याबाबत केंद्र व राज्य पातळीवर चर्चा करण्याचे सर्वाधिकार अशोकराव चव्हाण यांना देण्याचा ठराव त्यांनी यावेळी मांडला. या प्रस्तावाला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण, माजी आमदार हनमंत पाटील बेटमोगरेकर, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, ॲड. रामराव नाईक, जिल्हा परिषदेचे माजी सभापती माधवराव मिसाळे, देगलूर पंचायत समितीचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख बेळगावकर, देगलूरचे नगराध्यक्ष मोगलाजी शिरसेटवार, माजी नगराध्यक्ष शंकर कंतेवार, बिलोलीचे नगराध्यक्ष मारोती पटाईत, देगलूर तालुकाध्यक्ष ॲड. प्रीतमकुमार देशमुख, बिलोली तालुकाध्यक्ष प्रा. शिवाजी पाटील पाचपिंपळीकर, कुंडलवाडीचे माजी नगराध्यक्ष डॉ. शेंगूलवार, जिल्हा सरचिटणीस गिरीधर पाटील डाकोरे आदींनी अनुमोदन दिले. सूत्रसंचालन युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस केदार पाटील साळुंखे यांनी केले. या बैठकीस जितेश रावसाहेब अंतापूरकर, माजी नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी, दिलीप बंदखडके, डॉ. विजयकुमार धुमाळे, बालाजी टेकाळे, दीपक शहाणे, मुफ्तीसाहब, राजू हंदिखिरे, राजू कांबळे, जगदीश चिंतलवार, संजय वाळके, बसवराज पाटील आदींसह कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.