ओबीसी आरक्षण रद्द करणाऱ्या केंद्र शासनाच्या विरोधात शनिवारी काँग्रेसचे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:14 AM2021-06-25T04:14:44+5:302021-06-25T04:14:44+5:30
सर्वोच्च न्यायालयाने देशातील ओबीसींची आकडेवारी केंद्र सरकारकडे मागितली होती. परंतु केंद्र सरकारने ही आकडेवारी सर्वोच्च न्यायालयास दिली नाही. त्यामुळे ...
सर्वोच्च न्यायालयाने देशातील ओबीसींची आकडेवारी केंद्र सरकारकडे मागितली होती. परंतु केंद्र सरकारने ही आकडेवारी सर्वोच्च न्यायालयास दिली नाही. त्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे. याच्या निषेधार्थ छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने २६ जून रोजी सकाळी १० वाजता येथील पावडेवाडी नाका, गणेशनगर टी पॉईंटजवळील छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
ओबीसींचे राजकीय आरक्षण जाण्यामध्ये सध्याचे केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकार जबाबदार आहे. केंद्र शासनाने सर्वोच्च न्यायालयात ओबीसींची आकडेवारी दिली नाही. त्यामुळे हे राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे. ओबीसींचे हे राजकीय आरक्षण जाणे म्हणजे तमाम ओबीसींना सत्तेपासून वंचित ठेवण्याचा भाजपाचा घाट आहे. या सर्व बाबींचा निषेध व्यक्त करण्यासाठी पालकमंत्री अशोकराव चव्हाण व प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनेनुसार हे आंदोलन करण्यात येणार आहे.
या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन महानगराध्यक्ष आ. अमरनाथ राजूरकर, जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, जि. प. अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, महापौर मोहिनीताई येवनकर, उपमहापौर मसूदखान, जि. प.चे शिक्षण व बांधकाम सभापती संजय बेळगे, समाजकल्याण सभापती ॲड. रामराव नाईक, कृषी सभापती बाळासाहेब रावणगावकर, महिला व बालकल्याण सभापती सुशिलाताई बेटमोगरेकर, स्थायी समिती सभापती स. विरेंद्रसिंघ गाडीवाले, महिला व बालकल्याण सभापती संगीता पाटील डक, उपसभापती गीतांजली कापूरे, शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किशोर स्वामी, सिडको ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विनोद कांचनगिरे, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा कविता कळसकर, शहराध्यक्षा अनुजा तेहरा, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष रोहिदास जाधव, सेवा दल जिल्हाध्यक्ष आनंदराव गुंडले, शहराध्यक्ष लक्ष्मीकांत गोणे, मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष गंगाधर सोंडारे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पप्पू कोंढेकर, शहराध्यक्ष डॉ. विठ्ठल पावडे, प्रवक्ते संतोष पांडागळे, मुन्तजीब यांनी केले.