काँग्रेसचा मतांचा टक्का यंदा पहिल्यांदाच घसरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 12:19 AM2019-05-25T00:19:10+5:302019-05-25T00:20:25+5:30

गेल्या सहा लोकसभा निवडणुकीत यंदा पहिल्यांदाच काँग्रेसची मतांची टक्केवारी घसरली आहे़ यंदा झालेल्या वाढीव मतदानाचा लाभ भाजपाचे प्रताप पाटील चिखलीकर यांना मिळाला असताना वंचितने मुसंडी मारल्यामुळे त्याचा फटका थेट काँग्रेसला बसला आहे़ नवमतदारही भाजपाकडेच वळल्याचे दिसून आले़

the Congress's vote slipped for the first time | काँग्रेसचा मतांचा टक्का यंदा पहिल्यांदाच घसरला

काँग्रेसचा मतांचा टक्का यंदा पहिल्यांदाच घसरला

Next

शिवराज बिचेवार।
नांदेड : गेल्या सहा लोकसभा निवडणुकीत यंदा पहिल्यांदाच काँग्रेसची मतांची टक्केवारी घसरली आहे़ यंदा झालेल्या वाढीव मतदानाचा लाभ भाजपाचे प्रताप पाटील चिखलीकर यांना मिळाला असताना वंचितने मुसंडी मारल्यामुळे त्याचा फटका थेट काँग्रेसला बसला आहे़ नवमतदारही भाजपाकडेच वळल्याचे दिसून आले़
दरवेळी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपाच्या उमेदवारामध्ये केवळ चार ते पाच टक्के मतांचा फरक राहत होता़ ही पाच टक्के मतेच दरवेळी निवडणुकीत काँग्रेसच्या पारड्यात विजय टाकत होता़ यापूर्वी मकबुल सलीम, डॉ़व्यंकटेश काब्दे, गुणवंत हंगरगेकर, सुरेश गायकवाड असे सक्षम उमेदवार रिंगणात असताना त्यांना मिळालेली टक्केवारी ही निर्णायक ठरली नव्हती़ परंतु यावेळी बहुजन वंचित आघाडीने १४़७२ टक्के एवढी मते घेतली़ त्याचा मोठा फटका काँग्रेसलाच बसला़ २००९ मध्ये काँग्रेसचे भास्करराव पाटील खतगावकर यांना ४७़८१ टक्के तर भाजपाचे डॉ़धनाजीराव देशमुख यांना ४१़११ टक्के मते मिळाली होती़ १९९९ मध्ये काँग्रेसचे खतगावकर यांना ४४़६९ तर भाजपाचे धनाजीराव देशमुख यांना ४०़२४ टक्के मते होती़ यावेळी दोघांमध्ये केवळ चार टक्के मतांचा फरक होता़ २००४ मध्ये मात्र अचानक भाजपाची टक्केवारी वाढली होती़ भाजपाचे डी़ बी़ पाटील यांना ४५़१५ तर भास्करराव खतगावकर यांना ४२़११ टक्के मते होती़ २००९ मध्ये मात्र काँग्रेस आणि भाजपात तब्बल १० टक्क्यांचा फरक होता़ भास्करराव खतगावकर यांना ४६़५२ तर संभाजी पवार यांना ३६़५० टक्के मते होती़ तर २०१४ मध्ये अशोकराव चव्हाण यांना ४८़६७ टक्के मते मिळविली होती़ त्या तुलनेत डी़बी़पाटील यांना ४०़६३ टक्के एवढी मते मिळाली होती़ या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच काँग्रेसची टक्केवारी ४० पेक्षा कमी भरली़ अशोकराव चव्हाण यांना ३९़५५ टक्के तर भाजपाचे प्रताप पाटील चिखलीकर यांना ४३़६१ टक्के मते मिळाली़ भाजपाच्या टक्केवारीत फारशी वाढ झाली नसली तरी, काँग्रेसच्या टक्केवारीवर मतांच्या धु्रवीकरणाचा मोठा परिणाम झाला़ वंचित आघाडीचे यशपाल भिंगे यांनी तब्बल १४़७२ टक्के मिळविली़ यापूर्वी काँग्रेस-भाजपा व्यतिरिक्त तिसरा तगडा उमेदवार रिंगणात असताना त्यांनाही एवढी मते मिळाली नव्हती़

Web Title: the Congress's vote slipped for the first time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.