दुहेरी फायद्याचा विचार करता बांबूची लागवड ही अत्यंत महत्त्वाची - पाशा पटेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:44 AM2020-12-11T04:44:08+5:302020-12-11T04:44:08+5:30

बांबू मिशन मार्गदर्शन अंतर्गत आयोजित केलेल्या नांदेड तालुक्यातील निळा येथील शेतकरी शिबिरास मार्गदर्शन करण्यासाठी कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष ...

Considering the double benefit, planting bamboo is very important - Pasha Patel | दुहेरी फायद्याचा विचार करता बांबूची लागवड ही अत्यंत महत्त्वाची - पाशा पटेल

दुहेरी फायद्याचा विचार करता बांबूची लागवड ही अत्यंत महत्त्वाची - पाशा पटेल

Next

बांबू मिशन मार्गदर्शन अंतर्गत आयोजित केलेल्या नांदेड तालुक्यातील निळा येथील शेतकरी शिबिरास मार्गदर्शन करण्यासाठी कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ सुनील कदम, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती भगवानराव पाटील आलेगवकर, चैतन्य बापू देशमुख, डॉ श्याम तेलंग, बालाजीराव जाधव, नानक साई फाउंडेशनचे चेअरमन तथा ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ बोकारे, शेतकरी नेते प्रल्हादराव इंगोले हे सहभागी झाले होते.

यावेळी पाशा पटेल म्हणाले, गेल्या काही वर्षांपासून निसर्गाचे संतुलन बिघडत असल्याने शेती पिकांच्या उत्पादनात घट होतच आहे, याचा शेतकरी जवळून अनुभव घेत आहेत. परंतु झपाट्याने होत असलेल्या वृक्षतोडीमुळे वातावरणातील ऑक्सिजनचे प्रमाणही खूप घटत आहे. निसर्गाच्या बदलत्या संतुलनामुळे दिवसेंदिवस वातावरणात होत असलेले बदल आणि पृथ्वीचा होणारा ऱ्हास रोखण्यासाठी पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांनी आता बांबू लागवड करणे काळाची गरज असल्याचे मत पाशा पटेल यांनी व्यक्त केले.

प्रारंभी शिबिराचे मुख्य संयोजक भगवानराव आलेगवकर यांनी प्रास्ताविक करून बांबू मिशन बाबत माहिती दिली. संयोजन समितीचे सदस्य सतीश कुलकर्णी व सचिन डाकूलगे यांनी स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी पाटील यांनी केले ,यावेळी गोविंदराव कवळे सिंधीकर,आर. पी. कदम लिंबगावकर,भगवानराव पाटील डक, गोपाळराव कदम लिंबगावकर , अर्धापूरचे सभापती डॉ लक्ष्मणराव इंगोले, बाळासाहेब महागावकर,प्रा. उत्तमराव बोकारे, प्रा.शिवाजी पवार,बाबूराव शिंदे कासार खेडेकर, मारोतराव जोगदंड, शिवाजीराव जोगदंड, प्रकाशराव कदम पिंपरीकर, उत्तमराव पाटील आलेगवकर,तातेराव पाटील आलेगवकर, गोवर्धन पाटील, विनायक जोगदंड, बालाजीराव कदम, बालाजीराव भोजने, बाळासाहेब पाटील, बाबूराव पाटील, नवनाथ कदम,पंजाबराव सूर्यवंशी , पोपळे संभाजी यांच्या सह निळा, आलेगाव, वडवना, ,एकदरा, देगाव, कासारखेडा, पिंपरी, तळणी, धानोरा,सोमेश्वर जैतापूर, किनवट, नांदेड, मरळक, महागाव, लिंबगाव, चिखली , मालेगाव, परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Considering the double benefit, planting bamboo is very important - Pasha Patel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.