बँकांच्या संपामुळे ग्राहकांचे होणार हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:17 AM2021-03-14T04:17:28+5:302021-03-14T04:17:28+5:30
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प मांडताना आयडीबीआय आणि इतर दोन बँकांचे खासगीकरण करण्याचे संकेत दिले आहेत. बँकाचे विलगीकरण ...
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प मांडताना आयडीबीआय आणि इतर दोन बँकांचे खासगीकरण करण्याचे संकेत दिले आहेत. बँकाचे विलगीकरण आणि खासगीकरण या आर्थिक उन्नतीचा नसून छोट्या घटकांना बँकींगपासून वंचित ठेवण्याचा घाट आहे असे कर्मचारी संघटनांना वाटते. जे लोक मोठी कर्जे घेऊन बँकाना फसवितात. त्यांच्याच घशात या बँका घालण्याचा हा घाट असल्याचा आरोपही कर्मचारी संघटनेने केला आहे. त्यामुळे केंद्रीय स्तरावरील नऊ कर्मचारी संघटनांनी संप पुकारला आहे. यामध्ये ऑल इंडिया बँक एम्पॉईज असोसिएशन, ऑल इंडिया बँक ऑफीसर्स, नॅशनल कन्फेडेशन ऑफ बँक एम्प्लॉईज, ऑल इंडिया बँक ऑफीसर्स असोसिएशन, बॅंक एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया, इंडीयन नॅशनल बॅक एम्प्लॉईज फेडरेशन, इंडियन नॅशनल बॅंक ऑफीसर्स काँग्रेस, नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक वर्कर्स आणि नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बॅंक ऑफीसर्स या संघटनांचा समावेश आहे. सोमवार आणि मंगळवारी बँका बंद राहणार असल्यामुळे ग्राहकांचे मात्र मोठ्या प्रमाणात हाल होणार आहेत. त्यातच शनिवारीच शहरातील अनेक एटीएममध्ये खडखडाट होता. त्यामुळे पैसे काढण्यासाठी काही एटीएमबाहेर रांगा लागल्याचे दिसून आले.