नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागात दूषित पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 12:41 AM2018-05-07T00:41:52+5:302018-05-07T00:41:52+5:30

जलजन्य आजाराचे प्रमुख कारण ठरणाऱ्या दूषित पाण्याचे प्रमाण जिल्ह्यात २५ टक्के असल्याची बाब मार्च अखेरच्या तिमाही अहवालात पुढे आली आहे. नांदेड शहरातील दूषित पाण्याचे प्रमाण केवळ २.७० टक्के दर्शविण्यात आले आहे. वास्तवात हे प्रमाण अधिक आहे. जुन्या नांदेडसह शहरातील अनेक भागात दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

Contaminated water supply in rural areas in Nanded district | नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागात दूषित पाणीपुरवठा

नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागात दूषित पाणीपुरवठा

Next
ठळक मुद्देतिमाही अहवाल : नांदेडमध्ये केवळ २.७० टक्के दुषित पाण्याचे प्रमाण

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : जलजन्य आजाराचे प्रमुख कारण ठरणाऱ्या दूषित पाण्याचे प्रमाण जिल्ह्यात २५ टक्के असल्याची बाब मार्च अखेरच्या तिमाही अहवालात पुढे आली आहे. नांदेड शहरातील दूषित पाण्याचे प्रमाण केवळ २.७० टक्के दर्शविण्यात आले आहे. वास्तवात हे प्रमाण अधिक आहे. जुन्या नांदेडसह शहरातील अनेक भागात दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने पाणीनमुने तपासणीसाठी जिल्हा सार्वजनिक आरोग्य प्रयोग शाळेकडे पाठविले होते. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च १८ या तिमाहीचा अहवाल प्राप्त झाला आहे. जिल्ह्यात १९.४१ टक्के दूषित पाणीपुरवठा होत असल्याची बाब पुढे आली आहे. जानेवारी महिन्यात संपूर्ण जिल्ह्यात १ हजार ४८७ पाणीनमुने घेतले होते. त्यातील २८० नमुने दुषित आढळले. हे प्रमाण १८.८३ टक्के इतके आहे. फेब्रुवारीमध्ये १४०७ नमुने त्यापैकी २८२ दूषित आढळले. २०.६ टक्के प्रमाण दूषित होते. मार्च १८ मध्येही १ हजार ४६० पाणीनमुने घेण्यात आले. त्यापैकी २८३ नमुने दूषित निघाले. १८.३८ टक्के पाणीनमुने दूषित आढळले आहेत, तर जिल्ह्यात तीन महिन्यांत ४ हजार ३५३ पैकी ८४५ पाणीनमुने दूषित आढळले. हे प्रमाण १९.४१ टक्के आहे.
या दूषित प्रमाणामध्ये सर्वाधिक दूषित नमुने हे ग्रामीण भागातील आढळले आहेत. ग्रामीण भागात घेतलेल्या २ हजार ९७८ नमुन्यांपैकी ७५१ पाणीनमुने दूषित आढळले. २५.२१ टक्के पाणीपुरवठा दूषित असल्याची बाब या अहवालातून स्पष्ट होत आहे. नागरी भागातही ९.५ टक्के पाणीपुरवठा दूषित होत आहे. नगरपालिका क्षेत्रातील घेतलेल्या ८९५ पाणीनमुन्यांपैकी ८१ पाणी नमुनेही दूषित आढळले आहेत.
जिल्ह्यात टीसीएल नमुने तपासणीमध्ये जानेवारी ते मार्च या कालावधीत ४४ नमुने घेण्यात आले होते. त्यापैकी ग्रामीण भागात १० ठिकाणी २० टक्क्यांपेक्षा क्लोरीनचे प्रमाण कमी आढळले. शहरी भागातही क्लोरीनची कमतरता तीन ठिकाणी आढळली.

महापालिका हद्दीत जानेवारी ते मार्च १८ या कालावधीत ४८० पाण्याचे नमुने घेण्यात आले होते. या नमुन्यांपैकी १३ नमुने दूषित आढळले. जिल्हा सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेच्या अहवालानुसार नांदेड शहरात केवळ २.७० टक्के दूषित पाणीपुरवठा होतो. या तिमाहीत घेतलेल्या नमुन्यांपैकी १६० नमुने हे जानेवारी १८ मध्ये घेण्यात आले होते. त्यापैकी १३ ठिकाणचे नमुने दूषित आढळले; पण विशेष म्हणजे, फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या प्रत्येकी १६० नमुन्यांपैकी एकही नमुना दूषित आढळला नाही. त्यामुळे शहरात दोन महिने शुद्ध पाणीपुरवठा झाल्याचे हा अहवाल सांगतो. पण प्रत्यक्षात नांदेड शहरातील अनेक भागात दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी मागील सहा महिन्यांपासून येत आहेत.

Web Title: Contaminated water supply in rural areas in Nanded district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.