अतिगंभीर कोविड बाधितांना रुग्णांलयातील खाटांच्या माहितीसाठी नियंत्रण कक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:18 AM2021-04-08T04:18:03+5:302021-04-08T04:18:03+5:30

जे रुग्ण अतिगंभीर नाहीत, ज्यांनी लक्षणे दिसताच तात्काळ तपासणी करुन शासनाच्या सुचनेनुसार विलगीकरण अथवा कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेतले ...

Control room for information on hospital beds for critically ill people | अतिगंभीर कोविड बाधितांना रुग्णांलयातील खाटांच्या माहितीसाठी नियंत्रण कक्ष

अतिगंभीर कोविड बाधितांना रुग्णांलयातील खाटांच्या माहितीसाठी नियंत्रण कक्ष

Next

जे रुग्ण अतिगंभीर नाहीत, ज्यांनी लक्षणे दिसताच तात्काळ तपासणी करुन शासनाच्या सुचनेनुसार विलगीकरण अथवा कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेतले आहेत त्यांच्या तब्येती अधिक खालावलेल्या नाहीत. गृहविलगीकरण आणि कोविड केअर सेंटरच्या उपचारावरच ते बरे होऊन परतले आहेत. मात्र ज्यांनी अधिक काळ उपचार न घेता दुखणे अंगावर काढले आहे, त्यांनी स्वत: प्रकृतीला धोक्यात आणले आहे. अशा अतिगंभीर कोविड बाधित रुग्णांवर तात्काळ उपचार होण्याच्या दृष्टीने शासकीय व खाजगी रुग्णालयातील उपलब्ध खाटांची आवश्यक ती माहिती त्यांना मिळावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे २४ तास कोविड नियंत्रण कक्ष सुरु करण्यात आला असून त्यासाठी आवश्यक ते मनुष्यबळ देण्यात आले आहे. या कोविड कंट्रोल रुम येथे दुरध्वनीवरुन संपर्क साधावयाचा असल्यास त्यांनी ०२४६२-२३५०७७ या क्रमांकावर संपर्क साधावा.

Web Title: Control room for information on hospital beds for critically ill people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.