पारंपरिक सणावर कोराेनाचे सावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:15 AM2021-03-24T04:15:56+5:302021-03-24T04:15:56+5:30
जिल्ह्यात बंजारा समाजाची संख्या मोठी आहे. जिल्ह्यातील वाडी-वस्तीतांड्याने राहणारा हा समाज कोरोनापासून दूर आहे. तांडा हा शहरीकरणापासून दूर ...
जिल्ह्यात बंजारा समाजाची संख्या मोठी आहे. जिल्ह्यातील वाडी-वस्तीतांड्याने राहणारा हा समाज कोरोनापासून दूर आहे. तांडा हा शहरीकरणापासून दूर आहे. त्यामुळे लॉकडाऊन काळात बंजारा समाजाचा शिमगा (होळी) हा अत्यंत महत्त्वाचा सण येत आहे. या होळी सणाला बंजारा समाजातील एखाद्या कुटुंबात मुलगा जन्माला आला असेल तर त्या मुलाचे बारशे (धुंड) साजरा करण्याची परंपरा आहे. या होळी विधीनंतर दुसऱ्या दिवशी सकाळी जन्मलेल्या बाळाला होळीच्या ठिकाणी दर्शन घेण्याचीसुद्धा परंपरा आहे. गतवर्षी देशात लॉकडाऊन असल्याने हा सण साजरा करण्यात आला नाही. त्यामुळे यंदा लॉकडाऊन काळात तीन दिवस मुभा देण्याची मागणी समाजातून होत आहे. यामध्ये विविध नियमांचे पालन करण्याची बंजारा समाजाची तयारी असल्याचे पत्रकात म्हटले आहे.