राष्ट्रध्वजाच्या निर्यातीला कोरोनामुळे यंदा ब्रेक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2020 02:28 AM2020-08-13T02:28:34+5:302020-08-13T02:28:51+5:30
यंदा १६ ऐवजी केवळ ९ राज्यांतच राष्ट्रध्वज पाठविले
- भारत दाढेल
नांदेड : येथील मराठवाडा खादी ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने खादीच्या कपड्यापासून निर्मिती केला जाणारा राष्ट्रध्वज देशभरात फडकाविला जातो़ यंदा स्वातंत्र्य दिनानिमित्त ७८३ राष्ट्रध्वज तयार करण्यात आले आहेत़ दरवर्षी नांदेडमधून १६ राज्यांत राष्ट्रध्वज पाठविले जातात़ यंदा मात्र केवळ नऊ राज्यांमध्येच निर्यात झाली आहे>
कर्नाटकातील हुबळी आणि नांदेड या दोनच ठिकाणी खादी ग्रामोद्योग मंडळाकडून राष्ट्रध्वजाची निर्मिती केली जाते़ नांदेडमध्ये तयार राष्ट्रध्वज लाल किल्ल्यावरही पाठविला जातो़ नांदेडमध्ये सर्वात मोठा १४ बाय २१ फुट आकाराचा ध्वज तयार केला जातो़ ८ बाय २१ फुट, ६ बाय ९ फुट, ४ बाय ९ फुट, ३ बाय साडेचार फुट, २ बाय ३ फुट अशा विविध आकाराचे झेंडे तयार केले जातात. करण्यात येतात़
उत्पन्नात झाली ६० टक्के घट
च्राष्ट्रध्वज निर्मितीचे केंद्र नांदेडला असून, शंभर लोकांच्या हाताला काम मिळते़ उदगीर येथून कापड आणून नांदेडमध्ये झेंड्याची निर्मिती केली जाते़ मात्र, यंदा निर्मिती ६० टक्के घटल्याचे खादी ग्राम उद्योगचे महाव्यवस्थापक अरुण किनगावकर यांनी सांगितले.