कोरोनाचा मुकाबला फाजील आत्मविश्वासाने नव्हे, तर वेळेवर उपचार करूनच होऊ शकतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:22 AM2021-06-09T04:22:59+5:302021-06-09T04:22:59+5:30

कोरोना म्हणजे काय? त्याचा प्रसार कसा होतो, यावर डॉ. मान्नीकर यांनी विवेचन केले. ते म्हणाले, कोरोनाचे विषाणू ...

Corona can only be treated with timely treatment, not overconfidence | कोरोनाचा मुकाबला फाजील आत्मविश्वासाने नव्हे, तर वेळेवर उपचार करूनच होऊ शकतो

कोरोनाचा मुकाबला फाजील आत्मविश्वासाने नव्हे, तर वेळेवर उपचार करूनच होऊ शकतो

Next

कोरोना म्हणजे काय? त्याचा प्रसार कसा होतो, यावर डॉ. मान्नीकर यांनी विवेचन केले. ते म्हणाले, कोरोनाचे विषाणू शरीरात नाक, तोंड व डोळ्याच्या माध्यमातून प्रवेश करतात. त्यामुळे या प्रवेशद्वारांची योग्य पध्दतीने कोरोनास प्रतिबंध करण्यासाठी योग्य मास्क वापरणे, सतत हात धुणे, घरात हवा खेळती ठेवणे, सार्वजनिक वावरात योग्य अंतर ठेवणे याची अंमलबजावणी करून सतत काळजी घ्यावी.

स्वतःला व परिवारातील सर्वांना सुरक्षित ठेवायचे असेल, तर कोरोनाची प्राथमिक लक्षणे जाणवल्यास न घाबरता टेस्ट करणे, रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार घ्यावेत. ऑक्सिजन पातळी, शरीराचे तापमान योग्यपध्दतीने सतत तपासावे. शंका आल्यास वयस्कर व्यक्ती, तसेच ज्यांना मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग, मूत्रपिंड विकार असतील, तर रुग्णालयात दाखल करून उपचार घेण्याचा सल्ला त्यांनी दिला. सध्याच्या काळात कोरोना प्रतिबंधासाठी जी लस मिळेल ती घ्यावी. त्यामुळे कोरोना झाला तरी त्याची गंभीरता कमी होऊन माणसाच्या जिवाला धोका होत नाही, हे सिध्द झाले आहे. कोरोनाचे नियम पाळूनच आपण या संकटावर मात करू शकतो, असा विश्वासही त्यांनी दिला.

प्रास्ताविक अंजली देशमुख यांनी, तर विश्वास अंबेकर यांनी आभार मानले.

यशस्वितेसाठी डॉ. जगदीश देशमुख, शर्वरी सकळकळे, अभय शृंगारपुरे, डॉ. प्रमोद देशपांडे व राजीव देशपांडे यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Corona can only be treated with timely treatment, not overconfidence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.