कोरोना संकटात मानवी नातेही दुरावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:18 AM2021-03-10T04:18:59+5:302021-03-10T04:18:59+5:30

प्रतिक्रिया-------------- मरण तर प्रत्येकाला येणार आहे. पण समाजाचे देणे चुकवण्यासाठी चांगले काम करावे, या उदात्त भावनेतून हॅपी क्लबच्यावतीने कोरोना ...

The Corona crisis also alienated human relationships | कोरोना संकटात मानवी नातेही दुरावले

कोरोना संकटात मानवी नातेही दुरावले

Next

प्रतिक्रिया--------------

मरण तर प्रत्येकाला येणार आहे. पण समाजाचे देणे चुकवण्यासाठी चांगले काम करावे, या उदात्त भावनेतून हॅपी क्लबच्यावतीने कोरोना मयताच्या अंत्यसंस्काराची जबाबदार पार पाडण्यात आली. या प्रक्रियेत अनेक मयतांचे नातेवाईक पुढे आले नाहीत. विशेष म्हणजे काही लहान बालकांच्या जवळच्या नातेवाइकांचाही त्यात समावेश होता. ही बाब हादरून टाकणारी होती.

- मोहम्मद शोएब, हॅप्पी क्लब, नांदेड

कोरोना आजाराने मरण पावलेल्या रुग्णांच्या अंत्यविधीची जबाबदारी पार पाडत असताना हिंदूंसह मुस्लिमांवरही अंत्यसंस्कार करण्यात आले. नांदेडसह परभणी, यवतमाळ, हिंगोली, लातूर तसेच शेजारील तेलंगणातील मयतांचाही अंत्यविधी पार पाडला. यावेळी नातेवाइकांनी दर्शविलेला दुरावा दु:खद होता. - शेख अफताब, नांदेड.

नांदेड येथील गोवर्धनघाट शांतीधाम स्मशानभूमीत कोरोना मयतांचे बहुतांश अंत्यविधी पार पडले. यावेळी प्रशासनासह सामाजिक संस्थांचा पुढाकारही निश्चितपणे चांगला होता. परंतु रक्ताचे म्हणवले जाणारे नातेवाईक मात्र बोलावल्यानंतरही आले नाहीत. त्यामुळे हे माझे, ते माझे म्हणणारे कुठे असतील, असा प्रश्न वारंवार स्वत:ला पडत होता.

नरसिंग गायकवाड, व्यवस्थापक

Web Title: The Corona crisis also alienated human relationships

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.