कोरोनाने हिरावले शेकडो महिलांच्या कपाळावरील कुंकू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:13 AM2021-06-11T04:13:26+5:302021-06-11T04:13:26+5:30
कोराेनाने १८ महिलांना केले निराधार नांदेड जिल्ह्यात आजपर्यंत १८९४ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यामध्ये सर्वाधिक पुरुष असून महिला ...
कोराेनाने १८ महिलांना केले निराधार
नांदेड जिल्ह्यात आजपर्यंत १८९४ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यामध्ये सर्वाधिक पुरुष असून महिला मृत्यूचे प्रमाण कमी आहे. निराधार झालेल्या मुलांकडून तसेच अनाथांसाठी मदत उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालयाकडे अर्ज करत आहेत. आजपर्यंत शेकडो महिलांनी अर्ज केले आहेत. त्याची छाननी करून गरजूंना लाभ देण्यात येणार आहे.
अर्ज करण्याचे आवाहन
ज्या महिलांचे, मुलांचे कुटुंब कोरोनात गेले, अशांनी जिल्हा महिला बालविकास अधिकारी यांच्याकडे अर्ज करू शकतात. कुटुंबातील सदस्य तसेच आपल्या अवलंबून असलेल्यांची संख्या आदीविषयी माहिती देणे गरजेचे आहे. जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली नियुक्त केलेल्या समितीच्या माध्यमातून निराधार, अनाथांची अंतिम यादी तयार करून त्यांना शासनाकडून मदत मिळवून दिली जाणार आहे.
निराधार, अनाथ झालेल्यांचे अर्ज आले आहेत. त्यांची समितीच्या माध्यमातून तपासणी करून त्यांना शासनाकडून कोणत्या प्रकारची मदत मिळवून देता येईल, याची माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. लवकरच निराधार, अनाथांना जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मदत मिळेल.
- रेखा कदम-काळम, जिल्हा महिला बालविकास अधिकारी, नांदेड.