कोरोना उच्चांकी पातळीवर, सॅनिटायझरचा वापर मात्र ८० टक्क्यांनी घटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:18 AM2021-03-16T04:18:38+5:302021-03-16T04:18:38+5:30
सॅनिटायझरच्या किमतीही आता कमी जिल्ह्यात कोरोनाकाळात प्रारंभी मोठ्या प्रमाणात सॅनिटायझरची मागणी वाढली. त्यामुळे एमआरपी दराने व त्यापेक्षाही अधिक दराने ...
सॅनिटायझरच्या किमतीही आता कमी
जिल्ह्यात कोरोनाकाळात प्रारंभी मोठ्या प्रमाणात सॅनिटायझरची मागणी वाढली. त्यामुळे एमआरपी दराने व त्यापेक्षाही अधिक दराने नागरिकांनी खरेदी केली हाेती. मात्र त्यावर शासनाने नियंत्रण आणले आहे. त्याचवेळी सॅनिटायझर निर्मितीत अनेक नव्या कंपन्याही उतरल्या. त्यामुळे सॅनिटायझरचे दर नियंत्रणात व सामान्य नागरिकांना परवडेल इतपत खाली आले. आता सॅनिटायझरची विक्री कमी झाली हे वास्तव आहे.
अशोक गंजेवार - अध्यक्ष, नांदेड जिल्हा ड्रगिस्ट ॲन्ड केमिस्ट असोसिएशन, नांदेड
कोरोनाला प्रारंभ झाल्यानंतर मास्क व सॅनिटायझरचा वापर करण्याच्या सूचना दिल्यानंतर नागरिकांनी मेडिकल शोधून सॅनिटायझरची खरेदी केली. मात्र, आता ते चित्र बदलले आहे. सॅनिटायझरचा साठा असला तरी त्याची विक्री मंदावली आहे. मास्कला काही प्रमाणात मागणी असली सॅनिटायझरचा वापर मात्र २० टक्क्यांवर आला आहे. कृष्णा अवनुरे, फार्मासिस्ट.
कोरोनाची भीती कमी झाल्याने आता नागरिक सॅनिटायझरचा वापर कमी प्रमाणात करीत आहेत. गतवर्षीसोबत असणारे सॅनिटायझर आता बाजूला राहत आहे. आठवण आली तर ते वापरले जात आहे. पण याही परिस्थितीत काही नागरिक सॅनिटायझरचा वापर करणारे आहेत. पण त्यांची संख्या कमी आहे. देवानंद कल्याणकर- औषध विक्रेता
कोरोनाचे रूग्ण वाढत असल्याने आता काहीअंशी नागरिक हॅण्डवॉशचा वापर करत आहेत. मात्र, सॅनिटायझर, मास्कची मागणी नसल्यातच जमा आहे. कोरोना रोखण्यासाठी मास्क, सॅनिटायझरच्या या अत्यावश्यक बाबी असताना त्याकडे दुर्लक्ष करणे ही बाब गंभीरच आहे. यावर आता जनजागृतीची गरज निर्माण झाली आहे. - संदीप चंद्रवंशी, औषध विक्रेता