Corona In Nanded : उमरीकरांना दिलासा; संशयित रुग्णाचा रिपोर्ट निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 05:53 PM2020-03-31T17:53:35+5:302020-03-31T17:53:58+5:30

संशयिताची लक्षणे आणि पुणे प्रवासाचा इतिहास होता

Corona In Nanded: Relief to Umari citizens; Suspected patient report negative | Corona In Nanded : उमरीकरांना दिलासा; संशयित रुग्णाचा रिपोर्ट निगेटिव्ह

Corona In Nanded : उमरीकरांना दिलासा; संशयित रुग्णाचा रिपोर्ट निगेटिव्ह

Next
ठळक मुद्देधोका अजून टळला नाही घरीच रहा; आरोग्य विभागाचे आवाहन

उमरी :  कोरोना साथीच्या संशयावरून नांदेडला हलविण्यात आलेल्या " त्या " रुग्णाचा रिपोर्ट निगेटिव  आल्यामुळे तालुक्यातील आरोग्य खात्याने निश्वास  सोडला. तालुक्यातील नागरिकांनी येत्या १४ तारखेपर्यंत घराबाहेर पडू नये.  आपली काळजी घ्यावी असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले. 

कोरोना साथीच्या  सदृश्य लक्षणे असलेला एक रुग्ण अब्दुल्लापुरवाडी येथून उमरीच्या ग्रामिण रुग्णालयात दाखल झालेला होता . कोरोना  साथीच्या संदर्भातील सर्व लक्षणे व त्याचा पुण्याहून आलेला  इतिहास या गोष्टी पाहता डॉक्टरांनाही याबाबत शंका वाटल्याने त्यास पुढील उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले होते . या रुग्णाचे  स्वॅब नमुने पुणे येथे   प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले.  त्याचा अहवाल आज ३१  मार्च रोजी पाच वाजताच्या सुमारास उमरी येथे प्राप्त झाला. सदर रुग्णाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला असून काळजी करण्याची गरज नाही . असे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. एम.  देवराये,  ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शंकर चव्हाण ,  वैद्यकीय अधिकारी डॉ. माधव विभुते , डॉ. एम. एम. चंदापूरे  यांनी सांगितले . अजूनही येत्या १४  तारखेपर्यंत नागरिकांनी घराबाहेर पडू नये.  सुरक्षितपणे आपापल्या  घरीच राहावे .  असे आवाहन आरोग्य खात्याच्या वतीने करण्यात आले.

Web Title: Corona In Nanded: Relief to Umari citizens; Suspected patient report negative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.