कोरोना रुग्णांचा पुन्हा उच्चांक, १२९१ बाधित, १० जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:19 AM2021-03-23T04:19:08+5:302021-03-23T04:19:08+5:30
सोमवारी प्राप्त अहवालात आरटीपीसीआर तपासणीत मनपा क्षेत्रात ५६६, भोकर ११, देगलूर १२, हदगाव २, कंधार १, लोहा ३६, नायगाव ...
सोमवारी प्राप्त अहवालात आरटीपीसीआर तपासणीत मनपा क्षेत्रात ५६६, भोकर ११, देगलूर १२, हदगाव २, कंधार १, लोहा ३६, नायगाव ९, परभणी ४, हिंगोली १, नांदेड ग्रामीण २१, बिलोली ५, धर्माबाद १७, हिमायतनगर १४, किनवट २३, मुदखेड ३३, उमरी १३, यवतमाळ १ व अदिलाबाद जिल्ह्यातील २ रुग्ण बाधित आढळले. ॲन्टीजेन तपासणीत मनपा हद्दीत ३४१, धर्माबाद ७, भोकर ११. कंधार ७, लोहा ३३, मुदखेड ३७, नायगाव ६, परभणी २, हिंगोली १, नांदेड ग्रामीण १५, देगलूर ३०, हदगाव ३, किनवट ६, माहूर १६, मुखेड २, लातूर २ आणि अदिलाबाद जिल्ह्यातील एक रुग्ण बाधित आढळला.
सोमवारी ३९२ कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. त्यांना उपचारानंतर घरी सोडले. त्यात मनपा अंतर्गत ३०५, विष्णूपुरीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून १९, कंधार ३, माहूर ११, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल १६, हदगाव १, मुखेड ५ आणि खासगी रुग्णालयातून ३२ रुग्ण बरे झाले आहेत. आजघडीला जिल्ह्यात ६ हजार २६४ रुग्णांवर उपचार सुरू आहे. त्यातील ५९ जणांची प्रकृती गंभीर आहे. विष्णूपुरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १८८ रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटलमध्ये ८०, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नवी इमारत ९९, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय १५, किनवट ७६, मुखेड १२५, देगलूर १९, हदगाव ४३, लोहा १३०, कंधार २०, मांडवी ७, बारड ४, महसूल कोविड केअर सेंटर १०२ तर खाजगी रुग्णालयात ३७५ रुग्णांवर उपचार सुरू आहे. गृह विलगीकरणात ४ हजार १३२ रुग्ण मनपा अंतर्गत तर विविध तालुक्यांतर्गत १ हजार ११२ रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यात बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ७८.३३ टक्क्यांवर पोहोचले आहे.