कोरोनाने थांबले होते जग...पण नाही थांबले शिक्षण !'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:20 AM2021-03-09T04:20:23+5:302021-03-09T04:20:23+5:30

कामगार स्री पुरुषांची शारीरिक हेळसांडीबरोबरच गरिबी आणि येणाऱ्या अनेक संकटांशी झुंजच असते. वाजेगाव येथील विट कामगार मजूर रत्नमाला ...

Corona stopped the world ... but education didn't stop! ' | कोरोनाने थांबले होते जग...पण नाही थांबले शिक्षण !'

कोरोनाने थांबले होते जग...पण नाही थांबले शिक्षण !'

Next

कामगार स्री पुरुषांची शारीरिक हेळसांडीबरोबरच गरिबी आणि येणाऱ्या अनेक संकटांशी झुंजच असते. वाजेगाव येथील विट कामगार मजूर रत्नमाला व सुनील एडके यांची मुलगी, प्रियंका सुनील एडके ही गतवर्षीच्या पूर्वमाध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत प्राविण्यासह उत्तीर्ण झाली. सप्तरंगी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने तिला गौरविण्यात आले. यावेळी अनुरत्न वाघमारे, उपाध्यक्ष नागोराव डोंगरे, कोषाध्यक्ष गंगाधर ढवळे, राम गायकवाड यांची उपस्थिती होती. तसेच रत्नमाला एडके व सुनील एडके या तिच्या आई-वडिलांचाही सत्कार करण्यात आला. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला वीटकामगार प्रिया गायकवाड, अनुसया कांबळे, उगवता भदरगे, मंगल सोनटक्के, चांगुणा एडके, आशा एडके, माया एडके, सोनी गोविंद, शितल गोविंद, शिला सोनसळे, रोशनी गायकवाड, आकांक्षा गायकवाड या महिला व मुलींचाही सत्कार करण्यात आला.

Web Title: Corona stopped the world ... but education didn't stop! '

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.