कोरोनाने हिरावून घेतला निरागस बालकांचा आनंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:19 AM2021-04-23T04:19:16+5:302021-04-23T04:19:16+5:30
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन जाहीर केले असून सर्वांना घरातच बसण्याचे आवाहन केले आहे. ज्या ठिकाणी घराबाहेर जाणे शक्य ...
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन जाहीर केले असून सर्वांना घरातच बसण्याचे आवाहन केले आहे. ज्या ठिकाणी घराबाहेर जाणे शक्य नाही, तिथे मित्रांबरोबर फिरणे, खेळणे शक्य नाही. त्यामुळे या कोरोनामुळे लहान मुलांचा आनंद हिरावून घेतला आहे. प्रत्येकजण कोरोनाची धास्ती घेवून जीवन जगत आहे. परंतु निरागस मुलांना हे काय सुरू आहे, याचे गांर्भिय माहित नाही. त्यामुळे कधीही कोरोना जाईल अशी विचारणा ते करत आहेत.
चौकट- लहान मुलांचे विश्वच या कोरोना महामारीने बदलून टाकले आहे. मागील वर्षभरापासून शाळा बंद आहेत. त्यामुळे मुलांना आपल्या शाळेचे दर्शन झाले नाही. घराबाहेर जाण्यासही बंदी आहे. त्यामुळे हातात मोबाईल घेवून आनंद शोधण्याचा प्रयत्न मुले करत आहेत. मात्र आता त्याचाही कंटाळा आला आहे. त्यामुळे आम्हाला घराबाहेर मैदानावर जावून खेळायला कधी मिळेल, असा प्रश्न ते करत आहेत.