कोरोना बळींना आळा बसेना, १९ रुग्णांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:17 AM2021-05-10T04:17:34+5:302021-05-10T04:17:34+5:30
जिल्ह्यात रविवारी १ हजार ८५० अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी १ हजार ४९६ निगेटिव्ह, तर ३३७ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. ...
जिल्ह्यात रविवारी १ हजार ८५० अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी १ हजार ४९६ निगेटिव्ह, तर ३३७ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. एकूण रुग्णसंख्या आता ८४ हजार ९६१ वर पाेहोचली आहे. आरटीपीसीआर तपासणीत ११४ रुग्ण मनपा हद्दीत सापडले, तर नांदेड ग्रामीणमध्ये १७, अर्धापूर ८, बिलोली १६, देगलूर ८, धर्माबाद १, हदगाव २१, हिमायतनगर १, कंधार १, किनवट ७, लोहा १२, माहूर २, मुदखेड १५, मुखेड ४, उमरी ९, हिंगोली ३, परभणी ४, यवतमाळ ३, सोलापूर १ व तेलंगणामध्ये एक रुग्ण सापडला.
अँटिजन तपासणीत नांदेड मनपा क्षेत्रात ९, नांदेड ग्रामीण १, अर्धापूर १३, बिलोली ४, देगलूर २, धर्माबाद ५, हिमायतनगर १२, कंधार २३, किनवट ४, लोहा १, माहूर २, मुदखेड ३, नायगाव ३, यवतमाळ २, लातूर १ आणि हिंगोलीतील ४ रुग्ण बाधित आढळले.
रविवारी जिल्ह्यात ७१५ रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यात मनपाअंतर्गत एनआरआय भवन, गृहविलगीकरण व जम्बो कोविड सेंटरमधील ४१४, विष्णूपुरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील १०, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटलमधील १५, आयुर्वेद महाविद्यालयातील ४ आदी रुग्णांचा समावेश आहे.
चौकट - मयतांत २५ वर्षीय तरुणी, २८ वर्षीय तरुणाचाही समावेश
जिल्ह्यात रविवारी मृत्युमुखी पडलेल्या १९ कोरोना रुग्णांमध्ये बिलोली तालुक्यातील अंजनी येथील २५ वर्षीय तरुणीचा आणि बिलोली तालुक्यातील डोंगरगाव येथील २८ वर्षीय तरुणाचाही समावेश आहे. तसेच नांदेडमधील सांगवी भागातील ३५ वर्षीय पुरुष, धर्माबाद येथील ३९ वर्षीय पुरुष, सिडकोतील ५४ वर्षीय पुरुष, मुखेड तालुक्यातील बेटमोगरा येथील ५५ वर्षीय पुरुष, बळीरामपूर येथील ५८ वर्षीय महिला, वजिराबाद येथील ६१ वर्षीय महिला, लोहा येथील ७४ वर्षीय पुरुष, तरोडा येथील ८१ वर्षीय पुरुष, उमरीतील ६५ वर्षीय पुरुष, हिमायतनगर तालुक्यातील सिरंजनी येथील ६० वर्षीय महिला, पिरबुऱ्हाणनगर येथील ५७ वर्षीय पुरुष, नायगाव तालुक्यातील रातोळी येथील ६० वर्षीय पुरुष, नायगावमधील ६६ वर्षीय पुरुष, देगलूर तालुक्यातील कावलगाव येथील ६० वर्षीय पुरुष, बापूनगर येथील ६५ वर्षीय पुरुष, देगलूर येथील ७८ वर्षीय महिला आणि नांदेडमधील यशोधरानगर येथील ७५ वर्षीय पुरुषही कोरोनाचे बळी ठरले आहेत.