कोरोना योध्दा सन्मान कार्यक्रम संपन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:43 AM2021-01-13T04:43:36+5:302021-01-13T04:43:36+5:30
कोविड - १९ काळात नांदेड जिल्ह्यातील ज्यांनी प्रत्यक्ष जनसेवेचे कार्य केले, त्यांचा सन्मान होणे आवश्यक होते. विविध संस्था व ...
कोविड - १९ काळात नांदेड जिल्ह्यातील ज्यांनी प्रत्यक्ष जनसेवेचे कार्य केले, त्यांचा सन्मान होणे आवश्यक होते. विविध संस्था व शासकीय स्तरावर अनेक कोरोना योध्दयांचा गौरव करण्यात आला असून, काही रस्त्यावरच्या गरजवंतांना सहकार्य करणारे सन्मानापासून वंचितच होते. सीटूचे जनरल सेक्रेटरी कॉ. गंगाधर गायकवाड आणि माजी सैनिक दिवंगत काशीनाथ जाधव प्रतिष्ठानचे अध्यक्ष कॉ. रवींद्र जाधव यांच्या संकल्पनेतून कोरोना योध्दा सन्मान कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमात १७० योध्दयांना सन्मानित करण्यात आले असून, त्यामध्ये लोकप्रशासन, पोलीस, वैद्यकीय, विधी, पत्रकारिता आणि सामाजिक व सेवाभावी संस्थांच्या मार्फत प्रत्यक्षात कार्य केलेल्या मान्यवरांचा समावेश होता. प्रमुख पाहुणे म्हणून कॉ. विजय गाभणे, कॉ. ॲड. प्रदीप नागापूरकर, प्रा. सदाशिव भुयारे, कॉ. उज्ज्वला पडलवार, कॉ. सुभाशिष कामेवार, प्रा. डॉ. लक्ष्मण शिंदे, प्रितपालसिंघ साहू, भारत खडसे, संजय गोटमुखे, भारत सरोदे, अहेमद बाबा बागवाले, गणेश मोरे, प्रा. इरवंत सूर्यकार, प्रा. देविदास इंगळे, कॉ. संगीता गाभणे, पोलीस निरीक्षक अनंत नरूटे, सहाय्यक आयुक्त जगदीश कुलकर्णी, एबीपी माझाचे प्रतिनिधी धनंजय सोळंके, एमसीएनचे प्रमुख अंकुश सोनसळे, लोकमतचे उपसंपादक भारत दाढेल, पत्रकार रमेश मस्के, कॉ. श्याम लाहोटी, दलित मित्र गणेश गुरूजी वाघमारे, एमपीजेचे अल्ताफ हुसेन, पदवीधर ग्रामसेवक संघटनेचे सचिव सुनील पारडे, महेंद्र भटलाडे, साहेबराव गुंडिले, कॉ. बंटी वाघमारे आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कॉ. मारोती केंद्रे, कॉ. सं. ना. राठोड, कॉ. मुकेश गर्दनमारे, कॉ. संतोष बोराळकर, कॉ. जयराज गायकवाड, कॉ. दतोपंत इंळे, कॉ. मगदूम पाशा, कॉ. सुभाषचंद्र गजभारे, कॉ. संतोष साठे, कॉ. अनुराधा परसोडे, कॉ. द्रोपदा पाटील, कॉ. मीरा बहादुरे, कॉ. लता गायकवाड यांनी प्रयत्न केले.