कोरोना थांबेना, पुन्हा एकदा रुग्णांचा उच्चांकी आकडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:17 AM2021-03-19T04:17:29+5:302021-03-19T04:17:29+5:30

जिल्ह्यात गुरुवारी ३ रुग्णांचा मृत्यूही झाला आहे. त्यामध्ये नांदेड शहरातील चौफाळा भागातील ६० वर्षीय महिलेचा जिल्हा रुग्णालयात उपचारा दरम्यान ...

Corona will not stop, once again the highest number of patients | कोरोना थांबेना, पुन्हा एकदा रुग्णांचा उच्चांकी आकडा

कोरोना थांबेना, पुन्हा एकदा रुग्णांचा उच्चांकी आकडा

Next

जिल्ह्यात गुरुवारी ३ रुग्णांचा मृत्यूही झाला आहे. त्यामध्ये नांदेड शहरातील चौफाळा भागातील ६० वर्षीय महिलेचा जिल्हा रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला तर हदगाव येथील शिवाजी चौकातील ८५ वर्षीय पुरुष हदगावच्या कोविड रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यूमुखी पडला. नांदेड शहरातील लेबर कॉलनी येथील एका ७८ वर्षीय पुरुषाचा खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील २३६कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मातही केली आहे. गुरुवारी मनपा क्षेत्रातील १४७, विष्णूपुरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील १४, कंधार ४, देगलूर १, उमरी ५, धर्माबाद ५, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पीटल नांदेड १२, मुखेड १२, माहूर ४, मुदखेड ३, हदगाव १४ आणि खाजगी रुग्णालयातील १५ रुग्णांचा त्यामध्ये समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २४ हजार ५६५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

जिल्ह्यात सद्यास्थित ३ हजार ७२८ रुग्णांवर उपचार सुरू आहे. त्यात ५१ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. विष्णूपुरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १६४ रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पीटलमध्ये ८५, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पीटल, नवी इमारत ९९, किनवट कोविड रुग्णालय ३२, मुखेड ९५, देगलूर १२, हदगाव १९, लोहा ६२, कंधार ४, महसूल कोविड केअर सेंटर ९१ आणि खाजगी रुग्णालयात ३४८ रुग्ण उपचार घेत आहेत. गृह विलगीकरणातही रुग्णांना उपचार दिले जात आहेत. त्यामध्ये मनपा अंतर्गत २ हजार ११३ आणि जिल्ह्यातील विविध तालुक्यांतर्गत ६०४ रुग्ण घरीच उपचार घेत आहेत.

Web Title: Corona will not stop, once again the highest number of patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.