coronavirus : नांदेड जिल्ह्यात आणखी ११८ रुग्णांची वाढ; ५ बाधितांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2020 07:51 PM2020-08-24T19:51:36+5:302020-08-24T19:52:53+5:30
सोमवारी प्रशासनाला ५४५ जणांचे अहवाल प्राप्त झाले होते़ त्यापैकी ३५९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले़ तर ११८ जणांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले
नांदेड : जिल्ह्यात कोरोनाचे संकट अधिक गडद होताना दिसत आहे़ त्यात मृत्यूंची संख्याही दिवसेंदिवस वाढतच आहेत़ सोमवारी उपचार घेणाऱ्या पाच जणांचा मृत्यू झाला आहे़ त्यामुळे बळींचा आकडा आता १८८ वर पोहचला आहे़ तर नव्याने ११८ बाधित रुग्ण आढळून आले असून कोरोना रुग्णांची संख्या ५ हजार १५० पोहचली आहे़ त्यामुळे नांदेडकरांच्या चिंतेत भर पडली आहे़
सोमवारी प्रशासनाला ५४५ जणांचे अहवाल प्राप्त झाले होते़ त्यापैकी ३५९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले़ तर ११८ जणांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे़ त्यात आरटीपीसीआरद्वारे केलेल्या तपासणीत नांदेड मनपा क्षेत्र १८, नायगांव २, देगलूर ४, कंधार २, धर्माबाद १, परभणी २, लोहा ५, हदगांव ६, किनवट १, मुखेड २४ आणि हिंगोली येथील दोन रुग्णांचा समावेश आहे़ तर अँटीजेन तपासणीत नांदेड मनपा क्षेत्र १३, अर्धापूर १३, लोहा १, किनवट ५, मुदखेड ८, धर्माबाद २, नांदेड ग्रामीण १, देगलूर १, हदगांव २, मुखेड १ आणि बिलोली येथील चार जण बाधित आढळून आले़
शहरातील शक्तीनगर येथील २५ वर्षीय महिला, सहयोगनगर ६५ वर्षीय पुुरुष, प्रगती नगर ६८ वर्षीय पुरुष, शिवाजीनगर ७८ वर्षीय पुरुष आणि नायगांव तालुक्यातील आंतरगावच्या ६५ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे़
सध्या १ हजार ५९८ जणांवर उपचार सुरु आहेत़ त्यात विष्णूपुरी येथील रुग्णालय १७४, पंजाब भवन ६६७, जिल्हा रुग्णालय ५३, नायगांव ३७, बिलोली ३९, मुखेड १२६, देगलूर ३६, लोहा ४५, हदगांव ३९, भोकर १२, कंधार २२, किनवट २४, अर्धापूर २४, मुदखेड २७, माहूर ९, आयुर्वेदीक रुग्णालय २०, धर्माबाद ७२, उमरी ३६, हिमायतनगर २, बारड १, खाजगी रुग्णालय १२८, औरंगाबाद ४ आणि निजामाबाद येथे एका रुग्णाला संदर्भित करण्यात आले आहे़
आतापर्यंत ३ हजार ३२८ कोरोनामुक्त
जिल्ह्यात सोमवारी ११३ जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे़ त्यात जिल्हा रुग्णालय २, हदगांव ४, लोहा ५, मुदखेड ७, पंजाब भवन ७१, देगलूर १९, खाजगी रुग्णालय ४ आणि गोकुंदा येथील कोविड सेंटर येथील एका रुग्णाचा समावेश आहे़ आतापर्यंत ३ हजार ३२८ जणांनी कोरोनावर मात केली आहे़ १४३ जणांची प्रकृती गंभीर असून २६८ जणांचे अहवाल प्रलंबित आहेत़