coronavirus : संसर्ग टाळण्यासाठी नांदेड विभागातील ६ रेल्वे रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 06:05 PM2020-03-18T18:05:27+5:302020-03-18T18:05:50+5:30
नागपूर, मुंबई मार्गावर धावणाऱ्या गाड्यांचा समावेश
नांदेड : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वेकडूननांदेड विभागातून धावणाऱ्या जवळपास सहा रेल्वे गाड्या रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे़ यामध्ये नागपूर, मुंबई मार्गावर धावणाऱ्या गाड्यांचा समावेश आहे़
नांदेड विभागातून धावणारी गाडी क्र. ११२०१ लोकमान्य टिळक टर्मिनस- अजनी नागपूर २३ ते ३० मार्चपर्यंत रद्द केली आहे़ तसेच ११२०२ अजनी-लोकमान्य टर्मिनस २० ते २७ मार्चदरम्यान रद्द, गाडी संख्या ११२०५ लोकमान्य टर्मिनस-कामारेड्डी २१ ते २८ मार्चदरम्यान रद्द, गाडी संख्या ११२०६ कामारेड्डी ते लोकमान्य टर्मिनस २२ ते २९ मार्च या कालावधीत, गाडी संख्या ११४०१ मुंबई सीएसएमटी- नागपूर २३ मार्च ते १ एप्रिल आणि गाडी संख्या ११४०२ नागपूर ते मुंबई सीएसएमटी २२ ते ३१ मार्च या दरम्यान रद्द आहे.
देवस्थानांचे दर्शन बंद
देशातील ८ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या औंढानागनाथ, परळी वैद्यनाथ, श्रीक्षेत्र माहूरचे शक्तिपीठ, तुळजापूरचे तुळजाभवानी मंदिर, तसेच जालना येथील गुरुगणेश महाराजांचे समाधीस्थळ कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे. या मंदिरांमध्ये आरती तसेच पूजा मात्र, होत राहणार आहे.