Coronavirus : नांदेडमध्ये आणखी ७ बाधीत रुग्ण; लेबर कॉलनीतील ५ जणांचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2020 04:04 PM2020-06-04T16:04:29+5:302020-06-04T16:05:15+5:30
पाच रुग्ण नई आबादी भागातील बाधितांच्या संपर्कातील
नांदेड : बुधवारी २३ रुग्ण आढळून आल्यानंतर गुरुवारीही नांदेडकरांना आणखी एक धक्का बसला आहे़ कोरोनाचा नवे सात रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यातील बाधीतांची एकूण संख्या १८२ वर जावून पोहोंचली आहे़
गुरुवारी दुपारी ६९ स्वॅब नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले़ यातील ४७ नमुने निगेटिव्ह आढळले, ४ नमुने प्रयोगशाळेने नाकारले तर २ नमुन्यांचा तपासणी अहवाल प्रयोगशाळेने अर्नियीत ठेवला आहे़ नव्या ७ रुग्णामध्ये शहरातील लेबर कॉलनी भागातील ५ रुग्ण असून, हे पाचही जण नई आबादी येथील बाधीत कामगार रुग्णाच्या संपर्कातील नातेवाईक आहेत़ तर १ रुग्ण हा उमरखेड येथील रहिवासी आहे़ तर अन्य एक रुग्ण औरंगाबाद येथील रहिवासी असल्याचे आरोग्य विभागाच्यावतीने सांगण्यात आले़ दरम्यान, आजवर जिल्ह्यातील १२६ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले असून, सद्य:स्थितीत ४८ जणांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत़ तर ८ बाधीतांचा यापूर्वीच उपचारास प्रतिसाद न दिल्याने मृत्यू झाला आहे़