coronavirus : नांदेड जिल्ह्यात कोरोनाचे आणखी ८१ बाधीत आढळले; दोघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2020 07:55 PM2020-08-17T19:55:17+5:302020-08-17T19:58:03+5:30
जिल्ह्यातील एकूण कोरोना बळींची संख्या १४९ वर गेली आहे़
नांदेड : सोमवारी सायंकाळी प्राप्त झालेल्या ४३६ अहवालापैकी ३४४ अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले तर आणखी ८१ जण बाधीत असल्याचे आढळून आल्याने जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ४ हजार १८७ एवढी झाली आहे़ दरम्यान, मागील २४ तासात आणखी दोन रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याने एकूण कोरोना बळींची संख्या १४९ वर गेली आहे़
सोमवारी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपाक्षेत्रात १३ रुग्ण आढळून आले़ लोहा तालुक्यात १०, हदगाव ६, नायगाव ७, मुखेड २ तर किनवट, यवतमाळ, लातूर, हिंगोली आणि कंधार तालुक्यातील प्रत्येकी एक जण नांदेडमध्ये बाधीत आढळला आहे़ तर अॅन्टीजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात १२, मुदखेड तालुक्यात ७, बिलोली ५, नांदेड ग्रामीण आणि नायगाव तालुक्यात प्रत्येकी ४, कंधार आणि धर्माबाद तालुक्यात प्रत्येकी २ तर भोकर आणि अर्धापूर तालुक्यात प्रत्येकी १ जण बाधीत असल्याचे उघड झाले़ दरम्यान, सरपंचनगर येथील एका ७० वर्षीय महिलेवर शहराती खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते़ उपचारास प्रतिसाद न मिळाल्याने या महिलेचा १६ आॅगस्ट रोजी मृत्यू झाला़ तर विष्णुपूरीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु असलेला उमरी तालुक्यातील गोरठा येथील ५५ वर्षीय महिलेचाही उपचारा दरम्यान सोमवारी मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या १४९ झाला़ आहे़ आजवर जिल्ह्यात ४ हजार १८७ बाधीत आढळून आले असून सद्य:स्थितीत जिल्ह्यातील विविध कोविड केअर सेंटरमध्ये १ हजार ५३४ जणांवर उपचार सुरु आहेत़ यातील १८४ बाधीतांची प्रकृती गंभीर असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ भोसीकर यांनी सांगितले़
आजवर २४७७ जणांनी केली कोरोनावर मात : सोमवारपर्यंत ४ हजार १८७ कोरोना बाधीत आढळून आले असले तरी आजवर २ हजार ४७७ जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे़ सोमवारी जिल्ह्यातील ६३ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे़ यामध्ये मुखेड येथील ११, पंजाब भवन नांदेड ८, नायगाव, बिलोली प्रत्येकी ७, हदगाव ६, किनवट, उमरी प्रत्येकी ५, विष्णुपूरी नांदेड आणि कंधार प्रत्येकी ४, जिल्हा रुग्णालय ३, तर खाजगी रुग्णालयातील एकाचा यात समावेश आहे़