coronavirus : नांदेडकरांना दिलासा; ७९ जण कोरोनामुक्त; ५१ जणांवर उपचार सुरु 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 07:55 PM2020-05-26T19:55:47+5:302020-05-26T19:56:52+5:30

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने दिलासा

coronavirus : Consolation to Nandedkar; 79 patient corona free; treatment on 51 people | coronavirus : नांदेडकरांना दिलासा; ७९ जण कोरोनामुक्त; ५१ जणांवर उपचार सुरु 

coronavirus : नांदेडकरांना दिलासा; ७९ जण कोरोनामुक्त; ५१ जणांवर उपचार सुरु 

Next
ठळक मुद्देएकूण रुग्णसंख्या १३७ 

नांदेड : नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे १३७ रुग्ण आढळून आले आहेत़ त्यापैकी तब्बल ७९ जण ठणठणीत बरे होवून घरी परतले आहेत़ तर सध्या ५१ जणांवर उपचार सुरु आहेत़ रुग्णसंख्या वाढत असताना उपचारानंतर बरे होणाºयांची संख्याही समाधानकारक आहे़ त्यामुळे नांदेडकरांना थोड्या फार प्रमाणात का होईना दिलासा मिळत आहे़  त्यात आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे़ मात्र ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने चिंतेत वाढ झाली आहे़

सुरुवातीच्या काळात नांदेड शहरातील मर्यादीत भागातच कोरोनाचे रुग्ण सापडले होते़ त्यामध्ये नंतर इतर भागांची भर पडली़ ग्रामीणमध्ये फक्त बारड आणि माहूरमध्ये रुग्ण सापडले होते़ त्यानंतर किनवट, मुखेड, मुदखेड, बिलोली, नायगांव, भोकर यासह आता उमरी तालुक्यातही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत़ नांदेडची रुग्णसंख्या आता १३७ वर पोहचली आहे़ त्यातील सात जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे़ २५ मे रोजी १७० जणांचे अहवाल पाठविण्यात आले होते़ तर मंगळवारी आणखी ६३ जणांचे अहवाल पाठविण्यात आले आहेत़ त्यांच्या अहवालाची आता प्रशासनाला प्रतिक्षा आहे़

सध्या ५१ रुग्ण उपचार घेत आहेत़ त्यातील ७ डॉ़शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, पंजाब भवन कोविड सेंटर आणि यात्रीनिवास येथे २९, मुखेड ५, भोकर १, बिलोली १, माहूर १ येथे एका रुग्णावर उपचार सुरु आहेत़ आतापर्यंत १ लाख ३५ हजार १७३ जणांची तपासणी करण्यात आली आहे़ ३ हजार ४६० जणांचे स्वॅब घेण्यात आले होते़ त्यापैकी २ हजार ९४१ जण निगेटिव्ह आले आहेत़ नांदेड जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहेत़ तर दुसरीकडे ठणठणीत होणाºया रुग्णांचे प्रमाणही अधिक आहे़ आतापर्यंत एकुण ७९ जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे़ मंगळवारी चार जण ठणठणीत होवून घरी गेले आहेत़ रुग्ण बरे होण्याची संख्या ही सर्वांसाठीच दिलासा देणारी बाब ठरली आहे़ 

 १५९८ जणांनी केला क्वारंटाईन कालावधी पूर्ण
जिल्ह्यात लॉकडाऊनच्या काळात मोठ्या प्रमाणात नागरीक परत आले आहेत़ गेल्या दोन महिन्यातील ही संख्या जवळपास १ लाख ३५ हजार १७३ एवढी आहे़ त्यामुळे ३ हजार १०७ नागरीकांना क्वारंटाईनचा सल्ला देण्यात आला होता़ त्यापैकी १ हजार ५९८ जणांनी क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण केला आहे़ आतापर्यंत ३ हजार ४५२ संशयित आढळून आले आहेत़ तर २५७ जण निरिक्षणाखाली आहेत़ ६१ जणांना रुग्णालयात क्वारंटाईन करण्यात आले आहे़ तर घरीच क्वारंटाईन असलेल्यांची संख्या ३ हजार ५२ एवढी आहे़ अनेक जण स्वतहून क्वारंटाईन झाले आहेत़  
 

Web Title: coronavirus : Consolation to Nandedkar; 79 patient corona free; treatment on 51 people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.