coronavirus : नीट परीक्षेच्या तोंडावर कोरोनाचा धुमाकूळ; परीक्षा वेळेवर होण्याबाबत संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 03:12 PM2020-03-25T15:12:10+5:302020-03-25T15:38:45+5:30

विद्यार्थी-पालक चिंतेत; परीक्षा पुढे ढकलण्याची होतेय मागणी

coronavirus: Corona infection in the face of a fair examination; Confusion about the timing of the exam | coronavirus : नीट परीक्षेच्या तोंडावर कोरोनाचा धुमाकूळ; परीक्षा वेळेवर होण्याबाबत संभ्रम

coronavirus : नीट परीक्षेच्या तोंडावर कोरोनाचा धुमाकूळ; परीक्षा वेळेवर होण्याबाबत संभ्रम

googlenewsNext
ठळक मुद्दे3 मे रोजी नियोजित परीक्षाअभ्यासक्रमसुद्धा अपूर्ण राहिल्याने चिंता

- श्रीनिवास भोसले

नांदेड : वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणा-या विद्यार्थ्यांना नीट (NEET) प्रवेश परीक्षा देणे अनिवार्य आहे. नीट परीक्षेत संपादन केलेल्या गुणांच्या आधारे वैद्यक अभ्यासक्रमातील प्रवेश निश्चित केले जातात. परीक्षेला महिना शिल्लक असताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आल्याने सदर परीक्षा वेळेवर होणार की नाही, असा संभ्रम विद्यार्थी-पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

नीट परीक्षा ही सेंट्रल बोर्ड आॅफ सेकंडरी एज्युकेशनच्या (सीबीएसई)अंतर्गत आयोजित करण्यात येते. एनसीआरटीच्या अभ्यासक्रमावर आधारित नीट परीक्षा आहे. परीक्षांचे आयोजन करणे, निकाल तयार करणे, मेरिट यादी तयार करणे ही कामे सीबीएसईच्या माध्यमातून केली जातात. २०२० ची परीक्षा ३ मे रोजी होणार असल्याचे वेळापत्रक जाहीर झालेले आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांनी परीक्षा फॉर्म भरलेले आहेत. परंतु परीक्षेला दीड महिना शिल्लक असताना कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्याच्या उपाययोजना म्हणून राज्यातील जवळपास सर्वच महाविद्यालये, खासगी कोचिंग क्लासेस बंद करण्यात आली. त्यातच दहावी बोर्डाचे पेपरची पुढे ढकलण्यात आले आहेत. मात्र, राज्यातून जवळपास साडेतीन लाख विद्यार्थी ज्या परीक्षेला सामोरे जाणार आहेत, त्या नीट परीक्षेबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे लाखो कुटुंबामध्ये कोरोनाबरोबर नीट परीक्षेचीही चर्चा सुरू आहे.

विद्यार्थी-पालकांची मागणी
कोरोना पार्श्वभूमीवर सरकारने  १४ मार्च रोजी शाळा महाविद्यालयांना सुट्या जाहीर केल्या होत्या़ त्या सुट्टयाचे सर्व स्तरावरुन स्वागत झाले असले तरी मे महिन्यात येऊ घातलेल्या नीट परीक्षेसाठी महाराष्ट्रातून जवळपास साडेतीन  लाख विद्यार्थी बसणार आहेत. देशातील सर्वात मोठी परीक्षा असलेल्याने मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी प्रभावित झाले असून संबंधित मंत्रालयाने तथा विभागाने यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. सदर परीक्षा पुढे ढकलून हजारो विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टाळावे, अशी मागणी नीट परीक्षार्थी विद्यार्थी, पालक व शिक्षकानी केली आहे.

अभ्यासक्रम अपूर्णच; विद्यार्थी चिंतेत
नीट परीक्षेसाठी ११ वी आणि १२ वी या दोन्ही वर्षांचा अभ्यासक्रम असून विद्यार्थी दोन वर्ष या वैद्यकीय प्रवेश पूर्व परीक्षेसाठी तयारी करत असतात. सदर परीक्षेसाठी एनसीइआरटी अभासक्रम असून त्यासाठी विद्यार्थी मोठ्या संख्येने खाजगी शिकवणीची मदत घेत तयारी करतात. पण कोरोनामुळे ओढवलेलले संकट त्यात शाळा महाविद्यालयांनासह खाजगी क्लासेसला दिलेल्या सुट्ट्यांमुळे पुरेशी तयारी न झाल्याने विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकारने परीक्षा पूढे ढकलण्याची गरज आहे. तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे अधिक नुकसान होईल १४ मार्चपासून १४ एप्रिल या काळात  काही शहरी भागातील विद्यार्थ्यांनी इंटरनेट वा मोबाईलच्या सहाय्याने थोडीफार तयारी केली असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आॅनलाइन सुविधेअभावी तयारी न करता आल्याने त्यांच्यावर अन्याय होणार आहे. परिणामी ग्रामीण भागातील निकाल घसरून ग्रामीण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सरकारने नीट परीक्षा पूढे ढकलून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची काळजी घ्यावी अशी मागणी आयआयबीचे संचालक दशरथ पाटील यांनी केली. आयआयबीने आॅनलाइन सराव परीक्षा व व्हिडिओ लेक्चर च्या माध्यमातून विद्यार्थ्यांकडून सुट्ट्यांच्या काळात तयारी करून घेतली असली तरी ग्रामीण भागातील ७५ ते ८० टक्के विद्यार्थी यापासून वंचित राहिले असल्याचे सांगितले. तसेच परीक्षा पूढे  ढकलल्यास विद्यार्थ्यांना तयारीसाठी वेळ मिळाल्याने मोठा दिलासा मिळेल, अशी खात्री दशरथ पाटील यांनी व्यक्त केली.

Web Title: coronavirus: Corona infection in the face of a fair examination; Confusion about the timing of the exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.