coronavirus : नांदेडमध्ये कोरोनाचा उद्रेक; आणखी २२ रुग्ण आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2020 06:35 PM2020-06-13T18:35:26+5:302020-06-13T18:35:53+5:30
आतापर्यंत जिल्ह्यातील कोरोनाबळींची संख्या १३ एवढी आहे़
नांदेड : शनिवारी सायंकाळी २२ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या २५६ वर जाऊन पोहोंचली आहे़ विशेष म्हणजे शहराच्या विविध भागांत बाधित रुग्ण आढळत असल्याने नांदेडकरांची चिंता वाढली आहे़
मध्यंतरीच्या काळात बाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी झाले होते़ मात्र मागील चार दिवसांत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे़ मागील चार दिवसांत ६३ नवे रुग्ण आढळले आहेत़ बुधवारी १० बाधित रुग्ण आढळले होते़ त्यानंतर गुरुवारी त्यात २१ रुग्णांची भर पडली़ शुक्रवारी पुन्हा १० रुग्ण आढळले तर शनिवारी २२ रुग्ण आढळल्याने नांदेडमध्ये खळबळ उडाली आहे़ दरम्यान, जिल्ह्यातील कोरोनाबळींची संख्या १३ एवढी आहे़ तर १६८ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे़ सध्या जिल्ह्यातील विविध कोविड केअर सेंटरमध्ये ७५ रुग्णांवर उपचार सुरू सुरू असून त्यातील तीन रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़नीळकंठ भोसीकर यांनी दिली़