coronavirus : नांदेडमध्ये हाहाकार; आज दहा मृत्यू, १३४ बाधितांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 07:48 PM2020-07-28T19:48:02+5:302020-07-28T19:49:56+5:30
प्रशासनाला २८४ जणांचे अहवाल प्राप्त झाले होते़ त्यापैकी ८९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले़ तर १३४ जण पॉझिटिव्ह आढळले़
नांदेड : जिल्ह्याला मंगळवारचा दिवस हादरा देणारा ठरला आहे़ आतापर्यंतचा उच्चांक मोडीत काढत कोरोनाचे १३४ बाधीत आढळले असून दहा जणांचा मृत्यू झाला आहे़ त्यामुळे कोरोना रुग्णांनी दीड हजारांचा टप्पा ओलांडला असून आतापर्यंत ७० जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे़ वाढती रुग्ण आणि मृत्यूच्या संख्येमुळे नांदेडकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे़
गत महिनाभरापासून जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे़ दररोज दोन अंकी संख्येमध्ये रुग्ण आढळत आहेत़ यापूर्वी एकाच दिवशी सर्वाधिक ९४ बाधीत रुग्ण आढळून आले होते़ त्यानंतर बाधितांची संख्या सरासरी ५० च्या वरच राहिली आहे़ प्रशासनाने वाढत्या रुग्ण संख्येमुळे शेवटचा उपाय म्हणून लॉकडाऊनचा पर्यायही राबवून पाहिला़ परंतु लॉकडाऊनच्या काळातच तब्बल सातशे रुग्ण सापडले होते़ आता लॉकडाऊनमध्ये शिथीलता देण्यात आली आहे़ मंगळवारचा दिवस मात्र सर्वांसाठी धक्कादायक ठरला़ प्रशासनाला २८४ जणांचे अहवाल प्राप्त झाले होते़ त्यापैकी ८९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले़ तर १३४ जण पॉझिटिव्ह आढळले़
त्यामध्ये पाठक गल्ली १९, किल्ला रोड १, शिवाजीनगर १, शारदा नगर ४, अंबिका नगर १, हिंगोली गेट १, नवीन कौठा २, शिवशक्ती नगर १, भावसार चौक १, हैदरबाग १, दत्तनगर १, मोमीनपूरा १, दिलीपसिंग कॉलनी २, पी़जी़हॉस्टेल १, हडको ४, सिडको ४, शासकीय रुग्णालय विष्णूपुरी १, वाजेगांव १, रायखोड भोकर १, कुंभार गल्ली भोकर १, कासराळी ता़बिलोली १, सगरोळी ता़बिलोली ९, बापू नगर ता़देगलूर २, देशपांडे गल्ली देगलूर २, लाईन गल्ली देगलूर ४, बापू निवास साधना नगर देगलूर २, नांदूर ता़देगलूर १, रफिक कॉलनी देगलूर १, कोधेपिंपळगांव ता़देगलूर १, नाथ नगर देगलूर १, देगलूर १, कतीकल्लूर देगलूर ५, तोटावार गल्ली देगलूर १, घूमट बेस देगलूर १, भूतन हिप्परगा ता़देगलूर १, शांती नगर धर्माबाद १, रामनगर धर्माबाद ३, देवी गल्ली धर्माबाद १, गेट क्रमांक २ धर्माबाद २, हदगाांव २, बामणी ता़हदगांव १, शिराढोण ताक़ंधार १, दिग्रस ताक़ंधार १, बारुळ ताक़ंधार १, रंगार गल्ली कंधार १, मोमीन पूरा ता़ किनवट १, वाहेगाव बेटसांगवी १, जानापूरी ता़लोहा १, जाहूर ता़मुखेड १, शिवाजीनगर मुखेड १, सराफा गल्ली मुखेड १, दापका ता़मुखेड १, तग्लीन गल्ली मुखेड १, बापशेटवाडी ता़मुखेड २, खरब खंडगांव मुखेड ५, अंबुलगा ता़मुखेड २, मुक्रमाबाद ता़मुखेड २, महाकाली गल्ली मुखेड १, कोळी गल्ली मुखेड ४, मुखेड १, नायगांव ७, हिंगोली १, जालना १, पुसद जि़यवतमाळ १ आणि परभणी जिल्ह्यातील दोन रुग्णांचा समावेश आहे़
तर विष्णूपुरी येथील डॉ़शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार घेत असलेल्या दहा कोरोना बाधितांचा मृत्यू झाला़ त्यामुळे कोरोना बळींची संख्या आता ७० वर पोहचली आहे़ सध्या रुग्णालयात ६७७ बाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत़ त्यामध्ये विष्णूपुरी येथे १६६, पंजाब भवन २३५, जिल्हा रुग्णालय २५, नायगांव १५, बिलोली १४, मुखेड १०६, देगलूर ६२, उमरी १०, लोहा ४, हदगांव १३, भोकर २, कंधार ८, धर्माबाद १५, खाजगी रुग्णालय ४५, औरंगाबाद ५, निजामाबाद १ आणि मुंबई येथे एका रुग्णाला संदर्भित करण्यात आले आहे़
सर्व मृत्यू पन्नाशीच्या पुढचेच
कोरोनामुळे आतापर्यंत सर्वाधिक दहा जणांचे मृत्यू झाले आहेत़ त्यामध्ये जुना कौठा नांदेड-पुरुष, सिडको-पुरुष, मुदखेड-महिला, मोमीनपूरा किनवट- महिला, कासराळी ता़बिलोली-पुरुष, नवीन मोंढा नांदेड-पुरुष, रिठा ता़भोकर- पुरुष, देगलूर-महिला, कुंभार गल्ली वजिराबाद-पुरुष आणि वजिराबाद येथील एका महिलेचा त्यात समावेश आहे़ या सर्वांचे वय हे पन्नाशीच्या पुढेच आहे़ आतापर्यंत कोरोनामुळे नांदेड जिल्ह्यातील ७० जणांचा बळी गेला आहे़