CoronaVirus : अन्नधान्याचे ओझे वाहणाऱ्या हमालांच्या पोटाला बसतोय चिमटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2020 08:09 PM2020-04-15T20:09:33+5:302020-04-15T20:13:43+5:30
नांदेड शहरातील जुना आणि नवीन मोंढा परिसरात जवळपास दीड हजार महिला-पुरूष हमालीचे काम करतात़
- श्रीनिवास भोसले
नांदेड : दिवसभर अन्नधान्याचे ओझे स्वत:च्या खांद्यावर वाहणाऱ्या हमालांच्या कुटुंबियांवर सध्या उपासमारीची वेळ येवून ठेपली आहे़ लॉकडाऊनमुळे हाताला काम मिळत नसल्याने अशा शेकडो कुटुंबांना आज शासन, व्यापारी अन् सामाजिक संस्थांनी पुढाकार घेत मदत करण्याची गरज आहे़
नांदेड शहरातील जुना आणि नवीन मोंढा परिसरात जवळपास दीड हजार महिला-पुरूष हमालीचे काम करतात़ यामध्ये पुरूषांची संख्या अधिक असून नवीन मोंढ्या पाचशे ते सातशे जण हमाली करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात़ कोरोनामुळे देश लॉकडाऊन असल्याने त्याचा सर्वाधिक फटका मोलमजूरी, हमाली करून खाणाºया कुटुंबाना बसत आहे़
हाताला काम मिळत नसल्याने अनेकांच्या घरात संपूर्ण कुटुंबाचे पोट भरेल एवढं अन्न शिजत नाही, अशी भयानक परिस्थिती काही कुटुंबांमध्ये आहे़ मोंढ्यात येणाºया अन्नधान्य, शेतकºयांचा माल ट्रक वा ट्रॅक्टरमधून उतरून घेण्यासह गाड्या भरण्याचे आणि पोत्यांचे ओझे वाहण्याचे कष्टाचे काम हमाल करतात़ घाम गाळून पोट भरणाºया अशा शेकडो हातांचे काम लॉकडाऊनमुळे गेले आहे़ वाहने बंद असल्याने पायपीट करत मोंढ्यात येवून आणि दिवसभर थांबूनही हाताला काम मिळत नसल्याने रिकाम्या हाताने घरी परतावे लागते़ मात्र, जुना मोंढा परिसरात सध्या किराणा सामान, अन्नधान्याची आवक सुरू असल्याने काही हातांना काम मिळत आहे़ परंतु, नेहमीप्रमाणे मिळणाºया दिवसभराच्या कमाईत घट झाल्याने हमाल विकास बनसोडे यांनी सांगितले़
मालक आले़ धावूऩ़़
मुळचे कहाळा येथील असलेले तेलंग बंधू जुन्या मोंढ्यात हमाली करून आपल्या आठ सदस्य असलेल्या कुटुंबाचा गाडा हाकतात़ कोरोनामुळे अचानक हमाली बंद झाली़ त्यामुळे घराचा किराया कुठून द्यायचा आणि दररोज काय खायचे, असा प्रश्न पडला होता़ परंतु, या महामारीत आमच्यासाठी आमचे मालक बालाजी पाटील धावून आले़ त्यांनी अन्नधान्य आणि पैशाचीही मदत केल्याचे गंगाधर आणि अंबादास तेलंगे यांनी सांगितले़
मोंढ्यातील शेतमालाची आवक घटल्याने आमच्या हातालाही काम मिळेना आणि मजूरीही मिळत नाही़ रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे़ त्यामुळे येणारे दिवस कसे काढायचे आणि हा बंद असाच राहिला तर पोट कसे भरायचे, असा प्रश्न हमाल सुनील देवदासे यांनी उपस्थित केला़
व्यापा-यांचेही दातृत्व
आपल्याकडे काम करणाºया मजूर, हमाल आणि त्याचे कुटुंब उपाशी राहू नये म्हणून काही व्यापारी त्यांना पैशासह धान्याचीही मदत करत आहेत़ परंतु, काही हमालांपर्यंत पैसा अन् धान्यही पोहोचत नसल्याची खंत आडत व्यापारी बालाजी भायेगावकर यांनी व्यक्त केली़ त्यांना शासनाने सर्वोत्परी मदत करण्याची गरज आहे़ आपला देश धान्य पिकवणारा आहे़ त्यामुळे देशात कोणीही उपाशी राहू नये, यासाठी प्रयत्न गरजेचे आहेत़
पोलिसांची भीती कायमच
लॉकडाऊनमुळे घराबाहेर पडणे कठीण झाले आहेत़ त्यातच काही ठिकाणी पोलीस लाठ्यांचा प्रसाद देत आहेत़ त्यामुळे भीतीपोटील काही हमाल घराबाहेर पडत नाहीत तर ग्रामीण भागातून माल शहरी भागात येत नाही़ गाव, तालुका आणि जिल्हा पातळीवर वाहनांची अडवणूक होत असल्याने हळद, गव्हाचे सिझन असून देखील पोलीसांच्या भीतीने आपला माल नांदेडात घेवून येण्यास धजावत नाहीत़