coronavirus : नांदेड जिल्ह्याची रुग्णसंख्या दोन हजारांच्या उंबरठ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2020 11:45 PM2020-08-01T23:45:08+5:302020-08-01T23:47:16+5:30

अँटिजन किट्समुळे तपासणीचा वेग वाढला

coronavirus: Nanded district patient on the threshold of two thousand | coronavirus : नांदेड जिल्ह्याची रुग्णसंख्या दोन हजारांच्या उंबरठ्यावर

coronavirus : नांदेड जिल्ह्याची रुग्णसंख्या दोन हजारांच्या उंबरठ्यावर

googlenewsNext
ठळक मुद्देशनिवारी १४७ कोरोना रुग्ण आढळलेआतापर्यंत ९३५ जणांची कोरोनावर मातबळींचा आकडा ८३ वर गेला आहे़

नांदेड : जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहेत़ शुक्रवारी आजपर्यंतचे सर्वाधिक १५४ बाधित रुग्ण आढळले होते़ तर शनिवारी १४७ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले़ तर दोघांचा मृत्यू झाला आहे़ कोरोना रुग्णांची संख्या १९८६ एवढी झाली असून बळींचा आकडा ८३ वर गेला आहे़
 

जिल्ह्यात अँटिजन तपासणीला सुरुवात करण्यात आली आहे़ त्यामुळे तपासणीचा वेग आता वाढला आहे़ शनिवारी १२८१ जणांचे अहवाल प्रशासनाला प्राप्त झाले होते़ त्यातील १ हजार ८८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले़ तर १४७ बाधित रुग्ण आढळले़ त्यामध्ये ९६ जणांच्या तपासण्यात आरटीपीसीआर तर ५१ अँटिजन किट्सवर बाधित आढळून आले़ बाधित रुग्णांमध्ये गणेशनगर १, गोविंद कॉम्प्लेक्स एनएसबी कॉलेज १, बजाजनगर मारोती मंदिर जवळ १, नारायणनगर १, गीतानगर ७, वसंतनगर ६, मगनपुरा १, दीपकनगर १, खडकपुरा १, माळटेकडी देवीनगर १, चैतन्यनगर १, निझाम कॉलनी १, भावसार चौक ३, सिडको १, संभाजी चौक सिडको १, विष्णूपुरी १, लिंबगाव १, अर्सजन १, जंगमवाडी मालेगाव १, वृंदावन कॉलनी अर्धापूर २, देशपांडे कॉलनी भोकर १, आझाद कॉलनी देगलूर १, तोटावार गल्ली देगलूर १, ताल गल्ली देगलूर १, मारवाड गल्ली नांदेड २, हडको १, आनंदनगर १, जुना कौठा १, पोलीस कॉलनी १, वसंतनगर ३, श्रीनगर ३, लेबर कॉलनी ३, मित्रनगर १, उदयनगर ३, गोवर्धनघाट २, चिखलवाडी १, सिडको ३, कौठा १, भालचंद्र नगर १, गजानननगर १, शांतीनगर देगलूर १, भोई गल्ली देगलूर २, काब्दे गल्ली देगलूर २, गोकुळनगर देगलूर १, शेवाळा देगलूर १, देगलूर २, धर्माबाद १, शांतीनगर धर्माबाद १, गणेश मंदिर धर्माबाद १, ग्रामीण रुग्णालय धर्माबाद १, सोनखेड ता़लोहा ४, वाळकी ता़लोहा १, हातेपुरा ताक़ंधार २, फुलेनगर कंधार २, भवानीनगर कंधार १, कंधार १, नवी आबादी ता़हदगाव १, तामसा ता़हदगाव २१, यशवंतनगर हदगाव १, राजानगर हदगाव ७, हेडगेवार चौक नायगाव १, भैसा १, पालम जि़परभणी १, गजानन मंदिर नांदेड १, बडूर ता़बिलोली १, बाळापूर धर्माबाद १, नामदेव नगर धर्माबाद १, रुक्मीननगर धर्माबाद १, शिवाजीनगर धर्माबाद १, गांधीनगर धर्माबाद २, रसिकनगर धर्माबाद १, सरस्वतीनगर धर्माबाद १, देवी गल्ली धर्माबाद १, टीचर कॉलनी धर्माबाद १, विठ्ठल मंदिर धर्माबाद १, बेलूर ता़धर्माबाद १, बालाजीनगर धर्माबाद १, बेलापूर धर्माबाद २ आणि निझामाबाद तालुक्यातील पाच रुग्णांचा समावेश आहे़ तर शहरातील दत्तनगर येथील ४८ आणि चिरागगल्ली भागातील ७५ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे़ त्यामुळे कोरोना बळींची संख्या आता ८३ वर पोहोचली आहे़ वाढत्या रुग्णसंख्येने नांदेडकरांच्या चिंतेत मात्र भर पडली आहे़
 

आतापर्यंत ९३५ जणांची कोरोनावर मात
रुग्णसंख्या वाढत असली तरी, रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाणही दिलासादायक आहे़ शनिवार ४८ जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली़ त्यामध्ये मुखेड २२, कंधार ४, बिलोली १, पंजाब भवन २० आणि जिल्हा रुग्णालयातील एका रुग्णाचा समावेश आहे़ आजपर्यंत ९३५ जणांनी कोरोनावर मात केली आहे़ सध्या ९५७ बाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत़ त्यामध्ये ७ महिला आणि ८ पुरुष अशा १५ जणांची प्रकृती चिंताजनक आहे़ 

Web Title: coronavirus: Nanded district patient on the threshold of two thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.