Coronavirus News : माजी मुख्यमंत्री चव्हाण यांना पुढील उपचारासाठी मुंबईला हलवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 12:41 PM2020-05-25T12:41:41+5:302020-05-25T12:43:24+5:30
रविवारी नांदेडमध्ये खाजगी रुग्णालयात उपचार दिल्यानंतर आज मुंबईला पुढील उपचारासाठी हलवले आहे .
नांदेड : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची कोरोना टेस्ट रविवारी पॉजिटिव्ह आल्यानंतर रात्री नांदेडमध्ये त्यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले. आज सोमवारी सकाळी दहा वाजता मोटारीने त्यांना मुंबईला हलवण्यात आले आहे.
पालकमंत्री चव्हाण हे दोन दिवसांपूर्वी मुंबईहून नांदेडला परतले होते. त्यांना अस्वस्थ वाटत असल्याने त्यांची रविवारी सकाळी कोरोना टेस्ट घेण्यात आली. या चाचणीचा अहवाल पॉजिटिव्ह आल्यानंतर सर्वांना एकच धक्का बसला. तातडीने त्यांच्यावर उपचाराना प्रारंभ करण्यात आला. चव्हाण यांना रविवारी नांदेडमध्ये खाजगी रुग्णालयात उपचार दिल्यानंतर आज मुंबईला पुढील उपचारासाठी हलवले आहे .
दरम्यान, चव्हाण यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांच्या समर्थकांसह नांदेडात विरोधकही चिंतित झाले आहेत. सोशल मीडियावर चव्हाण यांना आरोग्य चिंतिनारे मेसेज मोठ्या संख्येने पाठवले जात आहेत.