coronavirus : नांदेड जिल्ह्यात कोरोनामुळे नऊ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2020 08:08 PM2020-08-22T20:08:32+5:302020-08-22T20:10:19+5:30

जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ४ हजार ९४३  

coronavirus: Nine killed by corona in Nanded district | coronavirus : नांदेड जिल्ह्यात कोरोनामुळे नऊ जणांचा मृत्यू

coronavirus : नांदेड जिल्ह्यात कोरोनामुळे नऊ जणांचा मृत्यू

Next
ठळक मुद्देशनिवारी १२२ नव्याने बाधित रुग्णांची भरआतापर्यंत १७७ जणांना गमवावा लागला जीव

नांदेड : जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होत आहे़ शनिवारी तब्बल नऊ जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला़ तर नव्याने १२२ बाधीत रुग्ण आढळून आले आहेत़ जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या आता ४ हजार ९४३ एवढी झाली असून १७७ जणांचा मृत्यू झाला आहे़

कोरोनाचा संसर्ग वाढतच असून शनिवारी प्रशासनाला ७८७ जणांचे अहवाल प्राप्त झाले होते़ ६२१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले होते़ तर १२२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले़ त्यात आरटीपीसीआरद्वारे केलेल्या तपासणीत नांदेड मनपा क्षेत्र १६, हदगांव ४, कंधार १, माहूर १, मुदखेड १, हिंगोली २, नांदेड ग्रामीण २, किनवट ४, लोहा २, मुखेड ३, नायगांव १ आणि निझामाबाद येथील एक रुग्ण आढळून आला आहे़ तर अँटीजेन तपासणीत नांदेड मनपा क्षेत्र ३८, अर्धापूर १, बिलोली १, देगलूर १, माहूर ४, धर्माबाद १३, नांदेड ग्रामीण २, भोकर २, हदगांव ३, कंधार ५, मुदखेड २ आणि मुखेड तालुक्यात १२ रुग्ण आढळले आहेत़ तर नऊ जणांचा मृत्यू झाला आहे़ त्यामध्ये संगमित्र कॉलनी नांदेड ५१ वर्षीय पुुरुष, असर्जन नांदेड ९० वर्ष पुरुष, तामसा ता़हदगांव ४२ वर्ष महिला, भावसार चौक नांदेड ७० वर्ष पुरुष, माद्री कॉलनी नांदेड ६० वर्ष पुरुष, विसावा नगर ६८ वर्ष पुरुष, छोटी गल्ली कंधार ६२ वर्ष पुरुष, लोहा ३३ वर्ष पुरुष आणि कंधार येथील ५३ वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे़ सध्या रुग्णालयांमध्ये १ हजार ६३२ जणांवर उपचार सुरु आहेत़

त्यात विष्णूपुरी येथील रुग्णालय १८७, पंजाब भवन ७४९, जिल्हा रुग्णालय ४६, नायगांव ३९, बिलोली ३४, मुखेड १०९, देगलूर ४४, लोहा ४३, हदगांव ३७, भोकर १६, कंधार १५, धर्माबाद ८१, किनवट २१, अर्धापूर ७, मुदखेड २४, माहूर ९, आयुर्वेदीक शासकीय रुग्णालय २२, बारड ३, उमरी १८, हिमायतनगर २, खाजगी रुग्णालय १२१, औरंगाबाद ४ तर निजामाबाद येथे एका रुग्णाला संदर्भित करण्यात आले आहे़ आतापर्यंत एकुण ३४ हजार ८९ जणांचे स्वॅब घेण्यात आले आहेत़

२०० जणांना रुग्णालयातून सुटी

शनिवारी कोरोनामुक्त झालेल्या २०० जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे़ त्यात विष्णूपुरी येथील रुग्णालय ५, जिल्हा रुग्णालय १, बिलोली ४, मुखेड ५, हैद्राबाद १, पंजाब भवन १४४, धर्माबाद ३४, खाजगी रुग्णालय ४ आणि नायगांव येथील २ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे़ तर सध्या १८८ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे़
 

Web Title: coronavirus: Nine killed by corona in Nanded district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.