coronavirus : नांदेड जिल्ह्यात बाधितांची संख्या पाच हजारांच्या उंबरठ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2020 07:08 PM2020-08-21T19:08:43+5:302020-08-21T19:11:46+5:30
जिल्ह्यात ४ हजार ८२१ रुग्ण आढळले आहेत
नांदेड : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढतच असून रुग्ण संख्या आता पाच हजारांच्या उंबरठ्यावर पोहचली आहे़ शुक्रवारी नव्याने १५१ जण बाधित आढळले असून सहा जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे़ आतापर्यंत जिल्ह्यात ४ हजार ८२१ रुग्ण आढळले असून १६८ जणांचा मृत्यू झाला आहे़
जिल्ह्यात अँटीजेन तपासणीची गती वाढविण्यात आली आहे़ त्यामुळे रुग्णांचा आकडाही वाढला आहे़ शुक्रवारी प्रशासनाला ८६१ जणांचे अहवाल प्राप्त झाले होते़ त्यामध्ये ६३८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत़ तर १५१ जण बाधित निघाले़ त्यात आरटीपीसीआरद्वारे केलेल्या तपासणीत नांदेड मनपा क्षेत्र ६८, देगलूर १७, हदगांव ५, मुखेड १८, लातूर १, नांदेड ग्रामीण १, बिलोली १, नायगांव १२ आणि हिंगोली येथील २ रुग्णांचा समावेश आहे़.
अँटीजेन तपासणीत नांदेड मनपा क्षेत्र २७, बिलोली १, लोहा २, मुखेड ९, उमरी १५, अर्धापूर ३, भोकर १, हदगांव १, कंधार ९, धर्माबाद ५ आणि हिंगोली जिल्ह्यातील दोन रुग्णांचा समावेश आहे़ तर वाजेगाव येथील ४१ वर्षीय आणि कैलासनगर येथील ५८ वर्षीय महिलेसह नवीन मोंढा कंधार ५६ वर्ष, चिखली खु़ ६६ वर्ष, शक्तीनगर नांदेड ६८ वर्ष आणि गुरुद्वारा गेट क्रमांक ४ बडपुरा नांदेड येथील ५३ वर्षीय पुरुष अशा सहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे़
सध्या १ हजार ७७१ रुग्ण उपचार घेत आहेत़ त्यामध्ये विष्णूपुरी येथील रुग्णालय १७८, पंजाब भवन ८५१, जिल्हा रुग्णालय ४५, नायगांव ४१, बिलोली ३७, मुखेड १००, देगलूर ५५, लोहा ५४, हदगांव ३१, भोकर १८, कंधार २८, धर्माबाद १०३, किनवट १०, अर्धापूर ८, मुदखेड २४, माहूर ९, आयुर्वेदीक रुग्णालय २३, बारड १, उमरी २०, खाजगी रुग्णालय १२९, औरंगाबाद ४, निजामाबाद १ आणि हैद्राबाद येथे एका रुग्णाला संदर्भित करण्यात आले आहे़
२ हजार ८४७ जण कोरोनामुक्त
जिल्ह्यात आतापर्यंत २ हजार ८४७ जणांनी कोरोनावर मात केली आहे़ शुक्रवारी ४४ जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली होती़ त्यात जिल्हा रुग्णालय १, विष्णूपुरी येथील रुग्णालय १, बिलोली १, कंधार ४, किनवट २, आयुर्वेदीक रुग्णालय १, देगलूर १८, पंजाब भवन २, मुखेड १३ आणि नायगांव येथील दोन रुग्णांचा समावेश आहे़