coronavirus : नांदेड जिल्ह्याची कोरोना रुग्णसंख्या तीन हजार पार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2020 06:45 PM2020-08-07T18:45:10+5:302020-08-07T18:47:59+5:30
शुक्रवारी प्रशासनाला १ हजार ४५९ जणांचे अहवाल प्राप्त झाले होते़ त्यापैकी १ हजार २३४ जण निगेटिव्ह आले तर १८२ बाधित आढळून आले़
नांदेड - जिल्ह्यात कोरोनाचे दररोज सरासरी दीडशे बाधित रुग्ण आढळून येत आहेत़ शुक्रवारी नव्याने १८२ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून पाच जणांचा मृत्यू झाला आहे़ रुग्ण संख्या आता ३ हजार ४२ एवढी झाली असून आतापर्यंत ११४ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे़ वाढत्या रुग्णसंख्येने सर्वांच्याच काळजीत भर टाकली आहे़
शुक्रवारी प्रशासनाला १ हजार ४५९ जणांचे अहवाल प्राप्त झाले होते़ त्यापैकी १ हजार २३४ जण निगेटिव्ह आले तर १८२ बाधित आढळून आले़ त्यामध्ये आरटीपीसीआरद्वारे केलेल्या तपासणीत नांदेड मनपा हद्द १९, अर्धापूर ५, बिलोली १, धर्माबाद १, कंधार ३, माहूर ३, नायगांव १, लोहा ७, हिंगोली ४, नांदेड ग्रामीण ४, भोकर १, देगलूर ३, हदगांव ७, किनवट ६, मुखेड १३, उमरी १ आणि परभणी १ येथील रुग्णांचा समावेश आहे़ तर अँटीजेन किट्सद्वारे तपासणी केलेल्यात नांदेड मनपा हद्द ३८, अर्धापूर ५, बारड ३, बिलोली १, धर्माबाद २, कंधार ६, मुखेड ३, हिंगोली १, नांदेड ग्रामीण ६, मुदखेड ५, भोकर १, देगलूर ६, हदगांव १, लोहा ३ आणि नायगांव तालुक्यात २१ बाधित रुग्ण आढळून आले आहेत़
शुक्रवारी पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू : हदगांव तालुक्यातील तामसा येथे ७५ वर्षीय पुरुष, भावसार चौक नांदेड ६० वर्षीय पुरुष, काझी मोहल्ला कंधार ४२ वर्षीय महिला, मोमीन गल्ली मुखेड ८६ वर्षीय पुरुष आणि किनवटच्या एसव्हीएम कॉलनी येथील ५२ वर्षीय महिलेचा समावेश आहे़ १०८ जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे़ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय ६, हदगांव १४, जिल्हा रुग्णालय ६, देगलूर ११, मुंबई येथील १, खाजगी रुग्णालय २५, मुखेड २५, गोकुंदा २, अर्धापूर १, पंजाब भवन १५ आणि औरंगाबाद येथे उपचार घेत असलेल्या दोन रुग्णांचा समावेश आहे़
पंजाब भवनमध्ये पाचशेहून अधिक रुग्ण
कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून एकट्या पंजाब भवन मध्ये तब्बल ५२६ रुग्ण उपचार घेत आहेत़ तर विष्णूपुरी येथील रुग्णालयात १५२, जिल्हा रुग्णालय ४०, नायगांव ९८, बिलोली २६, मुखेड १२१, देगलूर ९३, लोहा १५, हदगांव ६०, भोकर ८, उमरी १४, कंधार १७, धर्माबाद ३०, किनवट ३५, अर्धापूर २२, मुदखेड १७, हिमायतनगर २०, माहूर १०, आयुर्वेदीक रुग्णालय २८, बारड ५, महसुल भवन ४७, खाजगी रुग्णालय ११८, औरंगाबाद येथे ५, निजामाबाद १, हैद्राबाद १ आणि मुंबई येथे एका रुग्णावर उपचार सुरु आहेत़