coronavirus : धक्कादायक ! नांदेडमध्ये रुग्णसंख्येने ओलांडली शंभरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 10:55 PM2020-05-19T22:55:28+5:302020-05-19T22:56:37+5:30

आणखी नऊ पॉझिटिव्ह रुग्ण

coronavirus: The number of patients in Nanded has crossed 100 | coronavirus : धक्कादायक ! नांदेडमध्ये रुग्णसंख्येने ओलांडली शंभरी

coronavirus : धक्कादायक ! नांदेडमध्ये रुग्णसंख्येने ओलांडली शंभरी

Next
ठळक मुद्देएकूण रुग्णांची संख्या १०६ वर जाऊन पोहचली आहे़ 

नांदेड : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे़ मंगळवारी १८२ जणांच्या अहवालांची प्रतिक्षा होती़ त्यातील २८ जणांचा अहवाल सकाळी प्राप्त झाला़ त्यात एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला. दरम्यान रात्री पावणेअकराच्या सुमारास आणखी १३७ अहवाल प्राप्त झाले. त्यातील १२४ अहवाल  निगेटिव्ह आले असले तरी आठ अहवाल पॉझिटिव्ह आढळून आल्याने नांदेड जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या १०६ वर जाऊन पोहचली आहे़  

सोमवारी जिल्ह्यात एकही रुग्ण पॉझिटिव्ह आढळला नव्हता़ तर १८२ अहवालांची प्रशासनाला प्रतिक्षा होती़ त्यातील पॉझिटिव्ह आढळलेला एक जण करबला येथील रहिवाशी आहे असून वय ६० वर्ष आहे़ त्यामुळे करबला येथे सापडलेल्या रुग्णांची संख्या आता पाच झाली आहे़ या रुग्णांना यात्री निवास व एनआरआय भवन येथे ठेवण्यात आले आहे़ दरम्यान, आढळलेल्या एकूण पॉझिटिव्ह रुग्णापैकी ३० जण औषधोपचारानंतर बरे झाले आहेत़ त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे़

जिल्ह्यात एकुण २ हजार ७२० संशयित आढळून आले होते़ त्यातील   आतापर्यंत २ हजार ४८७ जणांना हातावर शिक्के मारुन क्वारंटाईन करण्यात आले आहे.  यातील १ हजार ७२ जणांनी क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण केला आहे़ १९८ जण निरिक्षणाखाली आहेत़ तर ५७ जणांना रुग्णालयात ठेवण्यात आले आहे़ घरीच क्वारंटाईन करण्यात आलेल्यांची संख्या २ हजार ४३० एवढी आहे़

मंगळवारी रात्री उशिरा प्राप्त झालेल्या स्वॅब तपासणी अहवालामुळे नांदेडकरांची चिंता अधिकच वाढली आहे. मंगळवारी सकाळी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर रात्री पावनेअकराच्या सुमारास १३७ जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यात आणखी आठ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्याने एकूण रुग्णांची संख्या १०६ वर गेली आहे.रात्री उशिरा बाधित आढळलेल्या रुग्णांमध्ये ५ पुरुष, दोन महिला आणि एका चार वर्षीय मुलाचा समावेश आहे.

Web Title: coronavirus: The number of patients in Nanded has crossed 100

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.