coronavirus : धक्कादायक ! नांदेड जिल्ह्यातील १७० कोरोनाबाधितांची प्रकृती गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2020 07:44 PM2020-08-20T19:44:32+5:302020-08-20T19:46:32+5:30

गुरुवारी ११५ रुग्ण आढळले तर १०३ जणांनी केली कोरोनावर मात

coronavirus: shocking! The condition of 170 corona patients in Nanded district is critical | coronavirus : धक्कादायक ! नांदेड जिल्ह्यातील १७० कोरोनाबाधितांची प्रकृती गंभीर

coronavirus : धक्कादायक ! नांदेड जिल्ह्यातील १७० कोरोनाबाधितांची प्रकृती गंभीर

Next
ठळक मुद्देजिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या ४ हजार ६७० एवढी झाली आहे.कोविड केअर सेंटरमध्ये १६७२ जणांवर उपचार करण्यात येत आहे.

नांदेड : गुरुवारी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार कोरोनाचे आणखी ११५ बाधित आढळून आले आहेत. त्यामुळे सध्या जिल्ह्यातील विविध कोविड केअर सेंटरमध्ये १६७२ जणांवर उपचार करण्यात येत असून यातील १७० जणांची प्रकृती गंभीर असल्याचे जिल्हा रुग्णालयाच्यावतीने सांगण्यात आले.

गुरुवारी सायंकाळी कोरोना तपासणीचे ७३८ अहवाल प्राप्त झाले. यातील ५७५ अहवाल निगेटिव्ह आले असून ११५ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या ४ हजार ६७० एवढी झाली आहे. गुरुवारी आढळलेल्या ११५ बाधितातील ४९ जण स्वॅब नमुना तपासणीद्वारे आढळून आले. तर ७४ जण अ‍ॅन्टीजेन टेस्टमध्ये बाधित असल्याचे निष्पन्न झाले. सध्या जिल्ह्यातील विविध कोविड केअर सेंटरमध्ये १६७२ जणांवर उपचार करण्यात येत आहे. यामध्ये सर्वाधिक ७९८ जण पंजाब भवन कोविड सेंटर येथे उपचारासाठी दाखल झाले आहेत. तर विष्णूपुरीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात २०२ जणांवर उपचार सुरू आहेत.

जिल्हा रुग्णालयात ४१, नायगाव येथे ३२, बिलोली ३८, मुखेड ३८, देगलूर ४६, लोहा ५३, हदगाव २४, भोकर २१, कंधार १६, धर्माबाद ९९, किनवट ११, अर्धापूर ६, मुदखेड २३, माहूर ६, शासकीय आयुर्वेदिक रुग्णालय १६, बारड १, उमरी २० तर खाजगी रुग्णालयात ११४ जणांवर उपचार सुरू आहेत.  चार जण उपचारासाठी औरंगाबाद येथे संदर्भित करण्यात आले आहे तर निजामाबाद आणि हैदराबाद येथे प्रत्येकी एक जण संदर्भित आहे.  यातील १७० जणांची प्रकृती गंभीर असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी सांगितले. दरम्यान, गुरुवारी किल्लारोड येथील एका ५५ वर्षीय पुरुषाचा विष्णूपुरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे आजवर कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या १६० एवढी झाली आहे.

नांदेड शहरात ३६ बाधित आढळले
गुरुवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार स्वॅब नमुना तपासणीद्वारे ११ तर अ‍ॅन्टीजेन टेस्टद्वारे २५ असे ३६ बाधित नांदेड मनपा क्षेत्रात आढळून आले आहेत. स्वॅब नमुन्याद्वारे अर्धापूर, मुखेड, मुंबई, परभणी, नांदेड ग्रामीण, लोहा, नायगाव आणि यवतमाळ येथील प्रत्येकी एकजण बाधित आढळला.  तर हदगाव, धर्माबाद आणि हिंगोली येथील प्रत्येकी दोघे, किनवट तालुक्यातील तिघे तर बिलोली तालुक्यातील ११ जण बाधित आढळले आहेत. अ‍ॅन्टीजेन तपासणीद्वारे बिलोली, किनवट येथील प्रत्येकी चार, मुदखेड ३, नायगाव ५, नांदेड ग्रामीण, कंधार प्रत्येकी २, धर्माबाद २३ तर देगलूर, यवतमाळ, भोकर, हदगाव येथील प्रत्येकी एक जण बाधित असल्याचे पुढे आले.

गुरुवारपर्यंत २८०३ जणांनी केली कोरोनावर मात
कोरोना बाधित रुग्ण आढळून येत असले तरी कोरोनावर मात करणा-यांची संख्याही लक्ष्यवेधी आहे. गुरुवारी आणखी १०३ जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली. यामध्ये जिल्हा रुग्णालयातील १८, आयुर्वेदिक रुग्णालयातील २, बिलोली येथील ११, मुदखेड ११, किनवट ५, भोकर ३, मुखेड ३४, पंजाब भवन कोविड केअर सेंटरमधील ४, उमरी ३ आणि धर्माबाद कोविड केअर सेंटरमधील १२ जणांनी कोरोनावर मात केल्याने या १०३ जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आजवर जिल्ह्यातील २८०३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. 

Web Title: coronavirus: shocking! The condition of 170 corona patients in Nanded district is critical

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.